
आमदार अनिल भोसले यांच्या पत्नीला तोतया ईडी अधिकाऱ्याचा फोन; म्हणाला…
मुंबई: राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नीला बनावट ईडी अधिकाऱ्याचा फोन आला होता. त्याने अनिल भोसले यांना ईडीच्या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी 15 कोटी रुपयांची मागणी केली. अनिल भोसले यांना शिवाजीराव भोसले बँक घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केली आहे.
अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांना एक कॉल आला आणि समोरच्या व्यक्तीने आपण ईडीचा अधिकारी असल्याची बतावणी केली. अनिल भोसले यांना तुरुंगातून सोडवायचे असेल तर 15 कोटी रुपयांची मागणी त्याने केली. त्यानंतर भोसले यांच्या पत्नीने तातडीने तक्रार केली. रेश्मा भोसले यांनी केलेल्या तक्रारीनुसार वरळी पोलिसांनी आयपीसी कलम 170, 384, 419, 420, 468, 120 (ब) सह कलम 66 (क), 66(ड) अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
ईडीचा अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या त्या बनावट अधिकाऱ्याने अनोळखी नंबरवरून कॉल केला होता. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत तोतया ईडी अधिकाऱ्याचा फोन आल्याची माहिती आहे. पुढील तपास वरळी पोलीस करत आहे
दरम्यान, पुण्यातील शिवाजीराव भोसले को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यासंबंधी राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अनिल भोसले हे सध्या ईडीच्या अटकेत आहेत. 25 फेब्रुवारी 2020 रोजी पुण्यातील शिवाजी भोसले को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यासंबंधी पोलिसांनी अटक केली होती. आमदार अनिल भोसले हे शिवाजी भोसले को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन आणि संचालक होते. या बँकेच्या घोटाळ्यासंबंधी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये सर्वप्रथम गुन्हा नोंदवण्यात आला होता. पुणे पोलिसांच्या एफआयआरचा आधार घेऊन ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग अॅक्ट (PMLA) कायद्याखाली आरोपपत्र नोंद केले होते. आता त्याच आधारे अनिल भोसले यांना ईडीने अटक केली होती.
विवस्त्र महिला धावतानाचा व्हिडिओ व्हायरल; भाजप आमदार पत्नीविरोधात गुन्हा दाखल…
आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल…
आमदारपुत्राची दादागिरी; बंदुकीच्या धाकाने व्यावसायिकाचे अपहरण…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!