पुणे! केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती; सिया-चेतनचं कसं जुळलं सूत पाहा…

पुणे: व्यावसायिक असलेल्या केतन अग्रलवाल (वय २४) याचा तोल गेल्याने लोहगडावरून ४०० फूट दरीत कोसळला असल्याचा बनाव आरोपी आणि त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिने रचला असल्याचे समोर आले. केतन अग्रवालच्या जीवावर उठणारे सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांची ओळख एका व्यवसायाच्या निमित्ताने झाली असल्याचे समोर आले. पोलिसांनी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सिया गोयल हिने होणाऱ्या पतीला प्रियकराच्या मदतीने लोहगड किल्ल्यावरून थेट ४०० फूट खोल दरीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया गोयल हिचे वडील पुण्यात ड्रायफ्रूट्स आणि मसाल्यांचे मोठे व्यापारी आहेत. सियाने बीबीएचे (BBA) शिक्षण अर्धवट सोडले होते. त्यानंतर तिने पुण्यात स्वतःचा बेकरी व्यवसाय सुरू केला होता. याच व्यवसायादरम्यान तिची ओळख चेतन चौधरी याच्याशी झाली. चेतनच्या वडिलांचाही ड्रायफ्रूट्सचाच मोठा व्यवसाय होता आणि त्यानेही बीबीएचे शिक्षण अर्धवट सोडले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

चेतन आणि सियाची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. दोघांना लग्न करायचे होते. पण दरम्यानच्या काळात सियाच्या घरच्यांनी तिचे लग्न पुण्याच्या नामांकित अग्रवाल कुटुंबातील केतन अग्रवाल याच्याशी निश्चित केले. अमेरिकेमधून शिक्षण घेऊन आलेला केतन एका बड्या रिअल इस्टेट कंपनीत संचालक होता. दोघांचा साखरपुडा झाला आणि नोव्हेंबरमध्ये उदयपूर येथे शाही विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र, त्याआधीच केतनचा काटा काढला गेला. दरम्यान, सियाच्या कुटुंबाला तिच्या प्रेम प्रकरणाची माहिती होती. मात्र, त्यांना हे मान्य नव्हते. मुलीचे लग्न लावून दिल्यानंतर ती चेतनपासून दुरावेल. त्यामुळेच लग्न जमवण्यात आल्याचे म्हटले जाते.

दरम्यान, केतन हा आपल्या होणाऱ्या पत्नीच्या प्रेमात बुडाला होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात त्याने प्री-वेडिंग शूटसाठी सियाला इंडोनेशियातील ‘बाली’ बेटावर नेण्याची तयारी केली होती. दोघे विमानतळावर जाण्यास निघाले, पण अचानक केतनचा पासपोर्ट गहाळ झाल्याचे समोर आले आणि त्यांना घरी परतावे लागले. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी सांगितले की, सियाला केतनसोबत बालीला जायचेच नव्हते, म्हणून तिने स्वतः केतनचा पासपोर्ट लपवून तो नष्ट केला होता. बालीचा प्लॅन फ्लॉप केल्यानंतर सिया आणि तिचा प्रियकर चेतन यांनी केतनला कायमचा हटवण्याचा कट रचला. त्याप्रमाणे सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर फिरण्याच्या बहाण्याने बोलावले. तिथे आधीच चेतन दबा धरून बसला होता. संधी मिळताच या दोघांनी मिळून केतनला ४०० फूट खोल दरीत ढकलून दिले. यामध्ये केतनचा मृत्यू झाला.

केतनला ढकलून दिल्यानंतर सियाने लिहिली भलीमोठी पोस्ट; म्हणाली तू मला…

पुणे! लग्नासाठी 2 विमानं बूक अन् केतन अग्रवालची खूनी निघाली होणारी बायको…

पुणे! लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, दोन विशेष विमाने; लग्नाआधीच युवकाचा मृत्यू…

प्रसिद्ध डॉक्टरने स्वतःला इंजेक्शन टोचून केली आत्महत्या; धक्कादायक माहिती समोर…

पुणे शहरात स्पा सेंटरवर पोलिसांची धाड; गॅलरीतून उडी मारताना महिलेचा मृत्यू…

पुणे! संक्रांतीच्या दिवशीच ट्रकच्या धडकेत सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू…

पुणे! नवीन थारने कोकणात जाताना अपघातात सहा मित्रांचा मृत्यू; पाहा नावे…

पुणे! नवले पूल अपघतात अभिनेत्याचा मृत्यू! चिमुकला झाला पोरका…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!