
पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल रात्रीच्या अंधारात पोहचले लोहगडावर अन्…
पुणे: केतन अग्रवाल (वय 25) याच्या हत्येप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिस रोज नवनवीन धक्कादायक बाबी समोर आणत आहेत. या गुन्ह्याची भीषणता आणि गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक (SP) संदीप सिंग गिल गुरुवारी (ता. २५) रात्री उशिरा लोहगडावर पोहोचले होते आणि त्यांनी घटनास्थळाची सखोल पाहणी केली. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची कायदेशीर प्रक्रिया पार पाडली असून, लोहगडावर घटनास्थळी जात पोलिसांकडून ‘क्राईम सीन रिक्रिएशन’ म्हणजेच घटनेचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

केतन, सिया आणि चेतन हे लोहगडावर आले तेव्हापासून ते हत्येच्या क्षणापर्यंत नेमके काय घडले, याचा संपूर्ण मार्ग पोलिसांनी पुन्हा तपासला. किल्ल्याच्या तिकीट घरावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे तिघे ज्या ठिकाणाहून जाताना दिसले होते, तिथपासून ते थेट लोहगडावरील ज्या दरीतून केतनला खाली ढकलण्यात आले, त्या मुख्य घटनास्थळापर्यंत पुणे ग्रामीण पोलिसांनी संपूर्ण पाहणी केली. घटना नेमकी कशी घडली, आरोपींची हालचाल कशी होती आणि तांत्रिक पुराव्यांचा ताळमेळ कसा लागतो, या सर्व बाबींची अत्यंत बारकाईने तपासणी करण्यात आली आहे.
संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल म्हणाले, ‘कोणत्याही गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळाची पाहणी करणे हे सर्वात प्रथम आणि महत्त्वाचे असते. तपास अधिकाऱ्यांनी ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. जिथे घटना घडली आणि जिथे मृतदेह सापडला, म्हणजेच धक्का दिल्यानंतर बॉडी नेमकी कुठे जाऊन पडली? या संपूर्ण अंतराचा आणि भौगोलिक स्थितीचा तपास करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक घटनास्थळावर दाखल झाले होते. आरोपींवर न्यायालयात दोष सिद्ध व्हावा आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी हा परिस्थितीजन्य पुरावा न्यायालयात अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.’
View this post on Instagram
दरम्यान, पोलिस कोठडीत असलेले दोन्ही आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी आता पोलिसांसमोर एकमेकांवरच हत्येच्या कटाचा आरोप करत आहेत. चेतन चौधरीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, “मला सियासोबत पळून जायचे होते. मात्र, केतनची हत्या करण्याचा आग्रह सियानेच धरला होता. सिया गोयलने हा दावा फेटाळत, “केतनच्या हत्येची पूर्ण कल्पना चेतनचीच होती,” असा प्रतिदावा केला आहे. पोलिसांच्या मते, कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी आणि स्वतःची शिक्षा कमी करण्यासाठी एकमेकांवर दोषारोप करणे ही आरोपींची एक बचावाची रणनीती असू शकते.
खळबळजनक खुलासा! सिया बारावी नापास, दारूचं व्यसन, अनेक बॉयफ्रेंड अन्…
सियाची आई म्हणाली; केतनने मुलापेक्षाही जास्त प्रेम दिलं; दोघांनाही ढकलून द्या…
सिया गोयल हिच्या वडिलांचा मोठा खुलासा; सगळं खोटं…
केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट; सिया-चेतनच्या दाव्यांमुळे पोलिसही चक्रावले…
केतन जिवंत असल्याचे पोलिसांनी सांगताच सियाला फुटला घाम…
केतनला संपवण्यासाठी सिया-चेतन महाभयंकर प्लॅन बी होता तयार; पोलिसही चक्रावले…
केतनशी लग्न ठरल्यानंतरही सियाचे अनेक मुलांशी चॅटिंग, CDR मधून हादरवणारी माहिती…
पुणे! केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती; सिया-चेतनचं कसं जुळलं सूत पाहा…
केतनला ढकलून दिल्यानंतर सियाने लिहिली भलीमोठी पोस्ट; म्हणाली तू मला…
पुणे! लग्नासाठी 2 विमानं बूक अन् केतन अग्रवालची खूनी निघाली होणारी बायको…
पुणे! लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, दोन विशेष विमाने; लग्नाआधीच युवकाचा मृत्यू…

