पोलिस ठाण्याबाहेर प्रेयसीचा गोंधळ अन् पोलिस उपनिरीक्षकाचा आढळला मृतदेह…

लखनौ (उत्तर प्रदेश): चितबडागाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाने धावत्या ट्रेनसमोर उडी घेऊन जीवन संपवलं आहे. प्रेमप्रकरणातील वाद आणि संबंधित युवतीकडून होणाऱ्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

संदीप कुमार असे आत्महत्या केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून, ते मूळचे उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्याचे रहिवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास धरमपूर रेल्वे ट्रॅकजवळ ही घटना घडली. लोको पायलटने पुढील स्थानकावर या घटनेची माहिती दिल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी रेल्वे रुळाजवळ एक मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तपास केला असता हा मृतदेह चितबडागाव ठाण्यातील उपनिरीक्षक संदीप कुमार यांचा असल्याचे समोर आले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक ईरज राजा यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक संदीप कुमार गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. चितबडागाव ठाण्यात रुजू होण्यापूर्वी ते उठाओ पोलिस ठाण्यात कार्यरत होते. या कालावधीत त्यांची एका युवतीसोबत ओळख आणि पुढे प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, काही काळानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले आणि संबंधित तरुणी संदीप कुमार यांना सतत त्रास देऊ लागली.

घटनेच्या दिवशीही संबंधित युवतीने चितबडागाव पोलिस ठाण्यात येऊन मोठा गोंधळ घातला. त्यावेळी ठाण्यातील इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी तिची समजूत घालून तिला परत पाठवले होते. या प्रकारामुळे संदीप कुमार प्रचंड अस्वस्थ झाले होते. त्यानंतर हा वाद मिटवण्यासाठी संदीप कुमार आणि युवती गाझीपूर कोतवाली येथे कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक दिनेश पाठक यांच्याकडे चर्चा करण्यासाठी गेले. मात्र, तिथेही दोघांमधील वादावर तोडगा निघू शकला नाही. चर्चा निष्फळ ठरल्यानंतर परतत असताना संदीप कुमार अत्यंत तणावाखाली होते. अखेर त्यांनी धरमपूर रेल्वे ट्रॅकजवळ आपली बुलेट उभी केली आणि धावत्या ट्रेनसमोर येऊन आपले जीवन संपवले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. बलिया पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिस भरतीवेळी प्रेम, नोकरी अन् युवतीने घेतला जगाचा निरोप…

प्रेमविवाहानंतर पोलिसाने गर्भवती असलेल्या कमांडो पत्नीला संपवलं…

प्रेमसंबंध! पोलिस अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी महिला शिपायाला अटक…

पोलिस आत्महत्या! प्रेमाचे दोन शब्द कधी तरी बोलली असती, तर..

प्रेमसंबंधाच्या चर्चेला उधाण! पोलिस अधिकाऱ्यासोबत बायकोला रंगहात पकडले अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!