
केतनला संपवण्यासाठी सिया-चेतन महाभयंकर प्लॅन बी होता तयार; पोलिसही चक्रावले…
पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवे गौप्यस्फोट समोर येत आहेत. साखरपुडा झालेल्या केतनचा काटा काढण्यासाठी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी रचलेला कट चित्रपटालाही मागे सोडेल असा होता, असे पोलिस तपासात समोर आले आहे. लोहगडचा कट फसला तर केतनला संपवण्यासाठी सिया आणि चेतन या दोन्ही आरोपींनी महाभयंकर प्लॅन बी तयार ठेवला होता, अशी माहिती पोलिसांना तपासादरम्यान समोर आली आहे.
केतन आणि सियाचा ११ फेब्रुवारी रोजी साखरपुडा झाला होता. ट्रेकिंगची आवड असलेल्या केतनने ३१ मे रोजी सियाला लोहगड किल्ल्यावर नेले. तिथे एका धोकादायक पॉईंटवर उभे असताना, सियाच्या डोक्यात पहिल्यांदा केतनचा काटा काढण्याचा विचार आला. १४ जून रोजी सियाने केतनला पुन्हा लोहगडावर नेले आणि मागून जोरदार धक्का दिला. सुदैवाने, एका झाडाचा आधार मिळाल्यामुळे केतन दरीत कोसळता कोसळता वाचला. त्याने दचकून विचारले, “धक्का का दिला?” त्यावर अत्यंत हुशारीने सियाने नाटक केले, “तिथे साप होता! तुला वाचवण्यासाठी मी धक्का दिला.” केतनच्या मनात कोणतीही कल्पना नसल्यामुळे घरी येऊन सर्वांना सांगितले की, “सियामुळे माझे प्राण वाचले!”
View this post on Instagram
सियाचा १९ जून रोजी वाढदिवस होता, त्यासाठी केतनने महाबळेश्वरमध्ये एक आलिशान रिसॉर्ट बुक केले होते. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी म्हणजेच १८ जून रोजी सियाने ‘प्री-वेडिंग फोटोशूट’चे कारण काढून केतनला पुन्हा लोहगडावर आणले. यावेळी तिचा प्रियकर चेतनही मागून पाठलाग करत तिथे पोहोचला होता. दुपारच्या वेळी जेव्हा केतन दरीकडे पाहत उभा होता, तेव्हा सिया आणि चेतन या दोघांनी मिळून त्याला मागून जोरदार धक्का दिला. या तिसऱ्या प्रयत्नात केतन याचा खोल दरीत कोसळून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप गिल यांना या प्रकरणात संशय आल्यामुळे त्यांना तपास करण्याचे आदेश दिले आणि सिया आणि चेतन चौधरी अडकले. पोलिसांना तपासादरम्यान आरोपींचा ‘प्लॅन बी’देखील तयार असल्याचे समोर आले आहे. सिया आणि चेतनने केतनला संपवण्यासाठी अनेक वेळेस रेकी केली होती. लोहगड किल्ल्यावरील कोणत्या पॉईंटवरून केतनला दरीत ढकलून द्यायचे, याची जागाही त्यांनी निश्चित केली होती. पण, जर निसर्गाची साथ मिळून केतन या तिसऱ्या प्रयत्नातूनही वाचला असता, तर सिया आणि चेतनचा ‘बॅकअप प्लॅन’ तयार होता. २० जूननंतर केतनचा एका रस्ते अपघातात गेम करायचा, असा हा महाभयंकर ‘प्लॅन बी’ होता. जेणेकरून पोलिसांना संशय न येता हा एक सामान्य अपघात वाटेल.

पुणे! केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती; सिया-चेतनचं कसं जुळलं सूत पाहा…
केतनला ढकलून दिल्यानंतर सियाने लिहिली भलीमोठी पोस्ट; म्हणाली तू मला…
पुणे! लग्नासाठी 2 विमानं बूक अन् केतन अग्रवालची खूनी निघाली होणारी बायको…
पुणे! लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, दोन विशेष विमाने; लग्नाआधीच युवकाचा मृत्यू…

