मुंबईत मराठी अभिनेत्री अडकली सेक्स रॅकेटमध्ये; एका रात्रीसाठी मिळायचे…

मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (युनिट 4) गिरगाव परिसरातील एका नामांकित आणि प्रतिष्ठित हॉटेलवर छापा टाकून एका हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्राशी संबंधित दोन अभिनेत्रींची अनैतिक व्यवसायाच्या विळख्यातून सुटका केली आहे.

पोलिसांनी एका प्रसिद्ध महिला मेकअप आर्टिस्टला हा घृणास्पद धंदा चालवल्याच्या आणि अभिनेत्रींच्या शरीराची तस्करी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. मानवी तस्करीविरोधातील एका कारवाईदरम्यान पोलिसांनी एका मराठीतील आघाडीची अभिनेत्री आणि एका बंगाली मॉडेलसह दोन महिलांची सुटका केली आहे. चित्रपटसृष्टीतील आपल्या ओळखींचा गैरवापर करून होतकरू अभिनेत्रींना वेश्याव्यवसायाच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप असलेल्या एका मेकअप आर्टिस्टवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. दोन अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री असल्याचे समोर आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पोलिसांच्या तपास आणि चौकशीतून या रॅकेटच्या आर्थिक व्यवहारांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या महिला मेकअप आर्टिस्टने एका श्रीमंत ग्राहकांशी दोन अभिनेत्रींसाठी एकूण 2 लाख रुपयांचा व्यवहार निश्चित केला होता. या करारानुसार, एका रात्रीसाठी प्रति अभिनेत्री 1 लाख रुपये असा दर ठरवण्यात आला होता. ग्राहकांकडून ती मोठी रक्कम स्वीकारून आणि स्वतःचं कमिशन वजा करून, ती महिला त्या दोन अभिनेत्रींना गिरगावमधील त्याच हॉटेलवर घेऊन गेली, तिथे दबा धरून बसलेल्या गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून तिला ताब्यात घेतले आहे.

मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटमधून सुटका करण्यात आलेल्या युवतींपैकी एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे, तर दुसरी बॉलिवूड अभिनेत्री आहे. बॉलिवूड चित्रपट आणि टेलिव्हिजन सीरिअल्समध्ये छोट्या भूमिका साकारल्या आहेत. सुटका करण्यात आलेली मराठी अभिनेत्रीकडे सध्या कोणतंही काम नव्हतं. त्यामुळे अभिनेत्रीच्या आर्थिक अडचणींचा फायदा आरोपी मेकअप आर्टिस्टनं घेतला आणि मोठा रकमेचं आमिष दाखवले.

मात्र, तिच्याकडे काम नसणे आणि आर्थिक अडचणींचा फायदा घेत, आरोपी मेकअप आर्टिस्टने तिला मोठ्या रकमेचे आमिष दाखवले आणि हळूहळू वेश्याव्यवसायाच्या काळ्या विश्वात ढकलले. चित्रपटसृष्टीतील इतर कोणती बडी मंडळी आणि दलाल या रॅकेटशी संबंधित आहेत, याचा तपास आता पोलिस करत आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांनी सुटका करण्यात आलेल्या महिलेची ओळख उघड केलेली नाही.

हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; मराठी, बंगाली अभिनेत्रींची सुटका…

उल्लूची अभिनेत्री चालवायची सेक्स रॅकेट; पोलिसांनी पकडले रंगेहात…

मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; आरोपींच्या मोबाईलमध्ये 546 मुलींचे अश्लील फोटो अन् व्हिडिओ…

व्हॉट्सऍपच्या माध्यमातून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा फर्दाफाश, तीन रशियन महिलांसह…

प्राध्यापकाच्या बंगल्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट; परदेशी युवतीसह…

सना खान हत्या प्रकरणात धक्कादायक वळण; सेक्सटोर्शन रॅकेट अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!