सिया हिचा धक्कादायक खुलासा; केतनला दरीत ढकलल्यानंतर चेतन पळून गेला अन्…

पुणे: लोहगड किल्ल्यावरील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिने कशा प्रकारे थंड डोक्याने आणि क्रूरपणे हा कट रचला, याचा संपूर्ण ‘क्राइम टाईमलाईन’ आता पोलिसांच्या हाती लागला आहे. केतनला कड्यावरून दरीत ढकलल्यानंतर सियाने तात्काळ मदत मागण्याऐवजी तब्बल १५ मिनिटे जो काही खोटा ड्रामा केला, त्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत.

सिया गोयल हिचा प्रियकर चेतन चौधरी याने केतनला कड्यावरून दरीत ढकलले. या कृत्यानंतर सियाने तात्काळ आरडाओरडा केला नाही. तिने सुरुवातीला तब्बल दोन मिनिटे पूर्णपणे शांत राहून आजूबाजूला कोणी पाहत नाही ना, याची खात्री केली. हा वेळ तिने प्रियकर चेतनला घटनास्थळावरून सुरक्षितपणे पळून जाण्यासाठी दिला होता. चेतन पोलिसांच्या आणि लोकांच्या नजरेतून दूर निघून गेल्याची खात्री पटल्यानंतरच सियाने आपली पुढची चाल खेळली.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)


केतन दरीत कोसळल्यानंतर अत्यंत गंभीर अवस्थेत असतानाही सियाने स्थानिक लोक किंवा पोलिसांची मदत मागितली नाही. तिने सर्वात पहिला फोन तिच्या आईला केला आणि सांगितले, “केतन लोहगड किल्ल्यावरून खाली पडला आहे.” त्यानंतर सियाच्या आईने ही माहिती केतनच्या पालकांना आणि इतर नातेवाईकांना दिली. सियाने पुढील १५ मिनिटे केवळ आपल्या कुटुंबाला आणि नातेवाईकांना फोन करण्यातच घालवले, ज्यामुळे केतनला वेळेवर मदत मिळण्यात उशीर झाला.

प्रियकर चेतन चौधरी सुरक्षित ठिकाणी पोहोचल्याची खात्री झाल्यावर सियाने अचानक मोठ्याने ओरडण्यास सुरुवात केली. “बचाओ! बचाओ! माझा होणारा नवरा दरीत पडला,” असा आक्रोश तिने सुरू केला. तिचा हा आवाज ऐकून किल्ल्यावरील इतर पर्यटक आणि स्थानिक नागरिक तिथे जमा झाले. जमलेल्या नागरिकांनी तात्काळ पोलीस आणि सुरक्षा रक्षकांना बोलावून बचावकार्य सुरू केले. सुरुवातीला अपघाती मृत्यू वाटणाऱ्या या घटनेचा तपास जसा पुढे सरकला, तसा सिया आणि चेतनचा हा संपूर्ण क्रूर डाव आता पोलिसांसमोर पूर्णपणे उघडा पडला आहे.

दरम्यान, पोलिसांनी आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना लोहगडावर नेऊन घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही आरोपींकडून संपूर्ण घटनाक्रम पुन्हा उभा करून घेतला जात आहे. केतनला नेमक्या कोणत्या ठिकाणावरून खाली ढकलण्यात आलं, घटना कशाप्रकारे घडली आणि त्यावेळी प्रत्येक आरोपीची भूमिका काय होती, याबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. या ‘सीन रिक्रिएशन’च्या माध्यमातून तपासाला महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना घटनास्थळी नेऊन त्यांच्या माध्यमातून नेमकी घटना कशाप्रकारे घडली, याची पुनर्रचना करण्यात आली. त्यावर बोलताना संदीप सिंग गिल यांनी मोठी माहिती दिली. ‘आम्ही सीन रिक्रिएट केला आहे. आरोपींनी आम्हाला सांगितलं की, घटना कशी झाली अन् ते कोणत्या रुटने गेले होते. घटना वास्तवात कशी आणली हे देखील सांगण्यात आले आहे’, असेही संदीप सिंग गिल यावेळी म्हणाले. प्रकरणात अजून पंचनामा केला जात आहे, असेही संदीप सिंग गिल म्हणाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतनने गुगलवर हत्येचे वेगवेगळे पर्याय शोधून काढले होते. पोलीस कारवाईपासून कसे वाचायचे, याचाही त्यांनी इंटरनेटवर अभ्यास केला होता. सिया आणि केतन 31 मे रोजी लोहगडावर फिरायले गेले होते. तिथेच सियाच्या डोक्यात केतनला दरीतून ढकलून अपघाताचा बनाव रचण्याची कल्पना आली. त्यानंतर तिने किल्ल्यावरील धोकादायक जागांचे लोकेशन्स चेतनला व्हॉट्सॲपवर पाठवल्याची देखील माहिती समोर आली आहे.

केतनच्या वडिलांनी सियाबद्दल केला मोठा खुलासा; तिला अनेक वाईट व्यसनं…

केतनचे टक्कल अन् एक गोष्ट खटकायची, पोलिस तपासात सिया लागली घडाघडा बोलू…

खळबळजनक खुलासा! सिया बारावी नापास, दारूचं व्यसन, अनेक बॉयफ्रेंड अन्…

पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल रात्रीच्या अंधारात पोहचले लोहगडावर अन्…

सियाची आई म्हणाली; केतनने मुलापेक्षाही जास्त प्रेम दिलं; दोघांनाही ढकलून द्या…

सिया गोयल हिच्या वडिलांचा मोठा खुलासा; सगळं खोटं…

केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट; सिया-चेतनच्या दाव्यांमुळे पोलिसही चक्रावले…

केतन जिवंत असल्याचे पोलिसांनी सांगताच सियाला फुटला घाम…

केतनला संपवण्यासाठी सिया-चेतन महाभयंकर प्लॅन बी होता तयार; पोलिसही चक्रावले…

केतनशी लग्न ठरल्यानंतरही सियाचे अनेक मुलांशी चॅटिंग, CDR मधून हादरवणारी माहिती…

पुणे! केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती; सिया-चेतनचं कसं जुळलं सूत पाहा…

केतनला ढकलून दिल्यानंतर सियाने लिहिली भलीमोठी पोस्ट; म्हणाली तू मला…

पुणे! लग्नासाठी 2 विमानं बूक अन् केतन अग्रवालची खूनी निघाली होणारी बायको…

पुणे! लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, दोन विशेष विमाने; लग्नाआधीच युवकाचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!