
पोलिस अधिकारी स्वाती साठे दरडावून म्हणाल्या, संजू, तू बातों से मानेगा या लातों से…
मुंबईः पोलिस अधिकारी स्वाती साठे यांच्या नावाची नुसती चर्चा ऐकून अनेक कुख्यात गुंड आणि डॉन देखील घाबरायचे. स्वच्छ प्रतिमा आणि कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून त्यांनी लौकिक होता. अनेक वर्षे त्यांनी तुरुंग प्रशासनाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात संजय दत्त, शाइनी आहुजा, याकूब मेमन, अजमल कसाब आणि अबू सालेम यांसारख्या मोठ्या गुन्हेगारांनी तुरुंगवास भोगला. एका कणखर आणि धाडसी महिला अधिकारी स्वाती साठे या ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाल्या आहेत.
मुंबई मधील १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनेता संजय दत्त याला टाडा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. तेव्हा तो तुरुंगातील कपडे घालण्यास नकार देत होता. तो हायप्रोफाइल आरोपी असल्याने काही तुरुंग कर्मचारी त्याच्याशी नम्रतेने वागत होते. पण तरीही संजय दत्त तुरुंगातील कपडे घालायला तयार नव्हता. ही बाब जेव्हा पोलिस अधिकारी स्वाती साठे यांना समजली. तेव्हा त्या तातडीने तिथे पोहोचल्या आणि त्याला दरडावून विचारले, “संजू, तू बातों से मानेगा या लातों से?” स्वाती साठे यांचा कणखर आवाज ऐकून संजय दत्त शांत झाला आणि त्याने लगेच तुरुंगातील कपडे घातले.
उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड आणि राजकारणी अतीक अहमद याला एका प्रकरणात मुंबईच्या तुरुंगात आणले होते. त्याने तुरुंगात येताच मला माझं जेवण बनवणारा आचारी हवा, अशी अजब मागणी केली. तेव्हा स्वाती साठे यांनी त्याची मागणी फेटाळून लावली आणि तुला तुरुंगातील जेवण घ्यावे लागेल, असे सांगितले. यामुळे अतिक अहमदचा इगो दुखावला. “आजपर्यंत माझ्याशी कोणीही अशाप्रकारे बोलण्याची हिंमत केली नाहीये,” असे अतिक म्हणाला. यावर साठे यांनी त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले, “तुमको क्या लगा कि यहां मुजरा देखने मिलेगा? अगर चिल्लाना बंद नहीं किया तो अंडा सेल में डाल दूंगी,” असे बोलताच अतीक अहमद याची बोलती बंद झाली. त्यानंतर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी त्याला स्वाती साठे यांच्या शिस्तीबद्दल आणि स्वच्छ प्रतिमेबद्दल सांगितले. त्यानंतर अतीक अहमद शांत झाला आणि दोन रात्री जमिनीवरच झोपला.
स्वाती साठे यांनी जेव्हा आर्थर रोड तुरुंगाचा कार्यभार स्वीकारला, त्याच्या आधी तुरुंगात कैद्यांच्या पार्ट्या रंगायच्या. गँगस्टर्सचे वाढदिवस साजरे व्हायचे. पण स्वाती साठे यांनी पदभार स्विकारताच हे सगळं बंद पडलं. त्यांनी तुरुंगात सांस्कृतिक कार्यक्रम, भजन-गजल आणि योगाचे वर्ग सुरू केले. कैद्यांनीही याला चांगला प्रतिसाद दिला होता.
स्वाती साठे यांच्या कार्यकाळात, तेलगी स्टॅम्पपेपर घोटाळ्यात अनेक मोठे पोलीस अधिकारी आणि सरकारी अधिकारी तुरुंगात आले होते. त्यांना विशेष सुविधा मिळू नये, हे स्वाती साठे यांच्यासाठी मोठे आव्हान होते. त्या काळात अनेक गँगस्टर तुरुंगात एकमेकांसमोर आले होते. त्यामुळे गँगवॉर भडकण्याची भीती होती. हे टाळण्यासाठी साठे यांनी गँगस्टरना वेगवेगळ्या बराकीत ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पूर्ण दक्षता घेऊनही अबू सालेमवर मुस्तफा डोसाने चमच्याला धार लावून हल्ला केला होता.
दरम्यान, स्वाती साठे बाहेरून कठोर असल्या तरी कैद्यांनी सुधारावे ही त्यांची मनापासून इच्छा होती. त्यांनी कैद्यांसोबत बराच वेळ घालवल्याने त्यांना त्यांची मानसिकता आणि अडचणी चांगल्या माहीत होत्या. तुरुंगातून बाहेर पडल्यावर कैद्याने सन्मानाने जगावे, यासाठी त्यांच्यात बदल होणे आवश्यक आहे, असे त्यांचे मत होते. अशाच कणखर आणि कर्तव्यनिष्ठ स्वाती साठे यांनी ३१ जुलैला निवृत्ती घेतली.
पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
28) पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
29) पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
30) पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
31) पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
32) सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!
33) सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!
34) वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!
35) वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!
36) वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!
37) वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!
38) वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!
39) सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
40) सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!
41) सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!
42) सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!
43) पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!
44) पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
45) पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे : जिद्द आणि यश खेचून आणणारा अधिकारी!
46) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अश्फाक तांबोळी : मोठा जनसंपर्क असलेला अधिकारी!
47) श्रेणी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल : आरोपींसाठी भारतभर तसेच देशाबाहेर भ्रमण!
48) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन धोंडगे: मदतीसाठी सदैव तत्पर असणारा सहकारी!
49) वैशाली घरटे-गवळी : पोलिस दलामुळे अश्रू पुसण्याचे भाग्य!
50) अश्विनी देवरे-शेवाळे : पोलिस दलातील जिद्दी आयर्नमॅन!
51) गणेश कोंडे : पोलिस दलातील श्वान पथकावर नितांत प्रेम!

