
नांदेडमध्ये विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू…
नांदेडः नांदेडमध्ये एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली असून ही हत्या केली असल्याचा आरोप मृत महिलेच्या आईने केला आहे. भाग्यनगर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरुन सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रियंका अभिजित अन्नपुरे असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. नांदेड शहरातील मालेगांव रोडवरच्या तुळशीराम नगर भागातील ही घटना आहे. महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला असून सासरच्या मंडळींनी तिची हुंड्यासाठी हत्या केली असा आरोप मृत विवाहितेच्या भावाने केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी भाग्यनगर पोलिस स्टेशनमध्ये सासू, सासरे, नणंद आणि नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
मुंबईत प्रेमी युगलाने घेतली रेल्वे एक्सप्रेससमोर उडी…
नाशिकमध्ये पत्नीसोबत प्रवास करणाऱ्या पतीची धावत्या रिक्षातून पुलावरून उडी…
पोलिसांना धमकी देणाऱ्या श्रीमंताच्या पोराची काही वेळातच उतरवली मुजोरी…
महिलेची सासरच्यांविरोधात तक्रार दाखल; नवऱ्याला अटक…
Video: हिंजवडीत सिमेंट मिक्सरखाली चिरडून दोन आयटी इंजिनियर युवतींचा मृत्यू…

