पुणे महामार्गावरील टोल नाक्यावर सोने, चांदी, मोत्यांसह सापडलं मोठं घबाड…
अहिल्यानगर : अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर तैनात असलेल्या पथकाने 23 कोटी 71 लाख रुपयांचे सोने, चांदी, हिरे, मोत्याचे दागिने पकडले आहेत. या दागिन्यांचा पंचनामा करून इतर कार्यवाही करून दागिने आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मुंबई येथील झवेरी बाजार येथून जीपमधून सोने-चांदी आणि हिरे, मोत्याचे दागिने घेऊन बीव्हीसी लॉजिस्टिक कंपनीचे कर्मचारी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जळगाव या ठिकाणी चालले होते. अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर तैनात असलेल्या पथकाने त्यांची चौकशी केली. याबाबत वेगवेगळी माहिती वाहतूक कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून दिली जात असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
कारवाईत चांदीची चाळीस किलोची वीट, सोन्याची बिस्किटे, तर एकूण 53 किलो चांदी, हिरे-मोत्यांचे दागिने ताब्यात घेतले आहे. तपासणीत 14 अधिकृत पावत्याही आढळून आल्या आहेत. वाहनासोबत असलेल्या वाहतूक कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे मौल्यवान वस्तूंची वाहतूक करण्याचा परवाना नव्हता. सुपा पोलिसांनी गोल्ड व्हॅल्युअर आणि कंपनीच्या प्रतिनिधींसमोर या संबंधीचा 15 पानांचा पंचनामा केला आहे. कारवाईतील सोन्या-चांदीच्या विटांसह इतर सोने, हिऱ्याचे दागिने आयकर विभागाकडे जमा करण्यात आले आहे. या प्रकरणी बीव्हीसी लॉजिस्टिक कंपनीचे कर्मचारी चालक शांतकुमार कट्टीवल्ली, भय्यासाहेब बनसोडे, दिगंबर काजळे, बीव्हीसी लॉजिस्टिक कंपनीचे असिस्टंट मॅनेजर गोरख भिंगारदिवे या चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
पुणे शहरात आणखी एका कारमध्ये सापडले लाखो रुपये…
पुण्यात 138 कोटी रुपये किमतीचे सोनं आलं कुठून? महत्त्वाची माहिती…
पोलिसांना मोटारीचा दरवाजा उघडताच दिसलं मोठं घबाड…
लाचखोर पोलिस निरीक्षकाच्या घरात सापडलं मोठं घबाड…
युवती झाडू काम करून उपजिल्हाधिकारी झाली अन् आता अटक…