पुणे जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास घडली गोळीबाराची घटना अन् १२ तासाच्या आत…

पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव पोलिस स्टेशनच्या परिसरात जमिनीच्या वादातून गोळीबाराची घटना घडली होती. पोलिसांनी १२ तासांच्या आतमध्ये एका आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

दौंड तालुक्यातील केडगाव स्टेशन परिसरात शनिवारी पहाटे गोळीबाराची थरारक घटना घडली होती. केडगाव स्टेशन परिसरातील एका गृहनिर्माण संस्थेच्या शेजारी हा गोळीबार झाला. जमिनीच्या व्यवहारातून दोन गटामध्ये वाद झाला होता. या वादातून एका जणाने हवेत गोळीबार केला होता. गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असलेल्या एकाने जमिनीच्या कारणावरून गोळ्या झाडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. पहाटेच्या शांततेत गोळीबाराचा आवाज आल्याने स्थानिक नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केली असता पिस्तुलीतून गोळीबार केलेल्या गोळीची पुंगळी सापडली.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि इतर माहिती गोळा केली. या प्रकरणी अखेरीस १२ तासांमध्ये एका गुन्हेगार युवकाला अटक केली आहे. जमिनीच्या वादातून दोन गटामध्ये वाद झाला होता. या वादातून गोळीबाराची घटना घडली होती. यवत पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहे.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात सुविधांचा अभाव; नागरिकांची गैरसोय…

पुणे! जुन्या वादातून गोळीबाराचा थरार! पिस्तूलासह दोघांना अटक…

पुणे जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर गोळीबार करत टाकला दरोडा…

Video: पुणे पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरोपींची काढली वरात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!