
धक्कादायक! मुंबईतील महाविद्यालयात युवतीचा मृत्यू; हत्या की आत्महत्या…
मुंबईः मुंबईतील सुप्रसिद्ध साठ्ये महाविद्यालयात शिकणाऱ्या संध्या पाठक (वय 21) या युवतीने महाविद्यालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन जीव दिल्याची घटना आज (गुरुवार) सकाळी घडली. संध्या हिच्या आत्महत्येच्या घटनेने साठ्ये महाविद्यालयात एकच खळबळ उडाली आहे. संध्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.
संध्या पाठक ही साठ्ये महाविद्यालयात स्टॅटिस्टिक्स (अंकशास्त्र) विभागात तिसऱ्या वर्षाला शिकत होती. आज ती नेहमीप्रमाणे सकाळी महाविद्यालयात आली होती. महाविद्यालयाच्या सकाळच्या सत्राची लगबग सुरू असताना संध्याने तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी घेऊन आत्महत्या केली. साठ्ये महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून संध्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात असले तरी तिच्या पालकांना हा दावा मान्य नाही. संध्याने आत्महत्या केलेली नाही, तिच्या बाबतीत घातपात झाला असावा. तिला तिसऱ्या मजल्यावरुन कोणीतरी ढकलले असावे, असा संशय संध्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या आत्महत्याप्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत ाहेत.
दरम्यान, संध्या पाठक ही आज सकाळी कॉलेजला आली होती. यानंतर सर्वजण वर्ग सुरु झाल्यानंतर आतमध्ये जाऊन बसले. मात्र, संध्या पाठक ही कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावर गेली आणि उडी मारली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती. खाली पडल्यानंतर संध्याच्या शरीरातून मोठ्याप्रमाणात रक्तस्राव झाला. तिला तातडीने जवळच्या बाबासाहेब गावडे चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
संध्या आत्महत्या करु शकत नाही, तिच्याबाबत घातपात झाला असावा, असे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणातील गूढ आणखीनच वाढले आहे. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपास सुरू केला आहे. महाविद्यालयातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. यापैकी एका कॅमेऱ्यात संध्या पाठक ही तिसऱ्या मजल्यावरील कॉरिडोअरमधून चालत जाताना दिसत आहे. मात्र, त्यानंतर तिने नेमकी कशी उडी मारली, त्यावेळी तिच्यासोबत कोणी होते का, हे प्रश्न अनुत्तरित आहेत. साठ्ये महाविद्यालयातील कॉरिडोअरमध्ये असणाऱ्या भिंती बऱ्यापैकी उंच आहेत. त्यामुळे संध्या चुकून तोल जाऊन खाली पडण्याची शक्यता फारच कमी आहे. तसेच साठ्ये कॉलेजच्या प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. यापैकी एकातरी कॅमेऱ्यात तिने उडी मारतानाचे दृश्य चित्रित झाले असावे, असा अंदाज आहे. पोलिस तपासातून माहिती पुढे येऊ शकेल.
युवकाने भररस्त्यात युवतीला काठीने केली मारहाण; इतर मुलांशी का बोलतेस…
पुणे शहरात महिलेने चिमुकल्यासह टेरेसवरून मारली उडी; चिठ्ठीत लिहिले…
Video: सयाजी राजे वॉटर पार्कमध्ये भीषण अपघातात उद्योजकाचा मृत्यू…
पुणे! प्रेयसीने घरी एकटी असताना प्रियकराला घरी बोलावले अन्…
हृदयद्रावक! कॅप्टन सुमित सभरवाल यांना पित्याकडून अखेरचा निरोप; काठी टेकत टेकत…

