घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रकरण! पुढील आदेशापर्यंत जैसे थे ठेवण्याचे आदेश…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक ठाकरे, संचालक आशिष लोणकर अपात्र प्रकरणात पुढील आदेशापर्यंत जैसे थे ठेवण्याचे आदेश न्यायमुर्ती नितीन बोरकर यांनी दिले आहेत.

घाटंजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अभिषेक शंकरराव ठाकरे व दि. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पांढरकवडा येथील विभागीय अध्यक्ष व संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आशिष सुरेशराव लोणकर यांना महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनीयमन) अधिनियम १९६३ च्या कलम १७ अन्वये जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ नानासाहेब चव्हाण यांनी संचालक पदावरून काढून टाकण्याचे आदेश पारित केले होते. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची बाजू ॲड. मंगेश गंगलवार (यवतमाळ) यांनी मांडली. तर उपसभापती सचिन देशमुख पारवेकर व ईतर संचालकांकडून ॲड. सोनाली लाडेकर (गंगलवार) यांनी वकील पत्र दाखल केले होते.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे दोन संचालक अपात्र प्रकरणात घाटंजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक ठाकरे, संचालक आशिष लोणकर यांनी सदर आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान याचिका दाखल केली असून सदर प्रकरणात युक्तिवाद होऊन पुढील आदेशापर्यंत कोणताही निर्णय घेण्यात येऊ नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन बोरकर यांनी दिला आहे. सदर प्रकरणाची पुढील सुनावणी १ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे. सदर प्रकरणात १ ऑक्टोबर २०२४ पर्यंत जैसे थे चे आदेश नियमित करण्यात आले आहे.

उच्च न्यायालयात दाखल प्रकरणात याचिकाकर्ते संचालक अभिषेक ठाकरे, संचालक आशिष लोणकर यांच‌‌‌तर्फे वरिष्ठ वकील ॲड. सुनील मनोहर, ॲड. वाय. एन. सांबरे यांनी युक्तिवाद केला. तर कॅव्हेटर म्हणून वरिष्ठ वकील ॲड. कप्तान, ॲड. आर. व्ही. गहीलोत यांनी बाजू मांडली. तर सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ॲड. जोशी यांनी काम पाहिले.

बिहारचे दबंग ips अधिकारी शिवदीप लांडे कोणत्या पक्षात प्रवेश करणार…

पुणे शहरात कामाच्या ताणामुळे युवतीचा मृत्यू; अजित पवार म्हणाले…

जय मालोकर याच्या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर; अमोल मिटकरी म्हणाले…

अभिनेत्री प्रकरण! तीन IPS अधिकाऱ्यांचे निलंबन…

Video : लष्करातील जवान न्यायाच्या लढाईसाठी रस्त्यांवर मागत आहेत भीक…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!