विद्यार्थिनीला मेसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला मारहाण; व्हिडिओ व्हायरल…
जयपूर (राजस्थान): एक शिक्षक विद्यार्थिनीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तो विद्यार्थिनीला वारंवार मेसेज करून त्रास देत होता. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाला पकडून तोंडाला काळं फासले आणि बेदम मारहाण केली. याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षिकाने सुद्धा मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीगंगानगर जिल्ह्यातील पदमपूर उपविभागातील 7DD गावातील […]
अधिक वाचा...जन्मदात्या मुलाने वडिलांची हत्या करून मृतदेह फेकला नदीत; पण…
परभणी : क्षुल्लक कारणावरून झालेला वादातून जन्मदात्या मुलानेच आपल्या वडिलांची हत्या केल्यानंतर मृतदेह परभणी जिल्ह्यातील इंद्रायणी नदी पात्रात फेकून दिला होता. परभणी पोलिसांनी तत्काळ तपासाचे चक्र फिरवत मृत व्यक्तीची ओळख पटवून, हत्या करणाऱ्या मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. मुंजा एकनाथ कटारे असे मृत व्यक्तीचे नाव असून, अशोक मुंजा कटारे असे आरोपी मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या […]
अधिक वाचा...साध्या वेशातील पोलिसांनी फ्रुटी वाटली अन् मास्क काढताच अडकले…
चंदीगड (पंजाब) : पंजाबमध्ये साडेआठ कोटींचा डल्ला मारणाऱ्या दरोडेखोर मनदीप कौर मोना आणि तिचा पती जसविंदर या दोघांच्या मसुक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. पोलिसांनी साडेआठ कोटींच्या दरोड्याप्रकरणी आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली असून 6 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. लुधियानाच्या न्यू राजगुरू नगरमध्ये 10 जून रोजी दरोडा पडला होता. त्याची मुख्य सूत्रधार मनदीप कौर […]
अधिक वाचा...एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन युवतीचा घेतला जीव…
सोलापूर : एकाने एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या केल्यामुळे सांगोला परिसरात खळबळ उडाली आहे. ऋतुजा दादासाहेब मदने असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. या घटनेतील संशयित आरोपी फरार असून, पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. सांगोला येथील महाविद्यालयीन युवती ऋतुजा हिचा धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली […]
अधिक वाचा...पत्नीबाबत अश्लिल बोललेल्या मित्राला पुलावरून फेकले खाली अन्…
पुणे : दारू पिताना बायकोबाबत अश्लील बोलला म्हणून दोन मित्रांनी मिळून आपल्याच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. दिनेश दशरथ कांबळे असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. सिद्धांत रतन पाचपिंडे व प्रतीक रमेश सरवदे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दारू पीत असताना दिनेशने प्रतीक सरवदे याच्या पत्नीबाबत अश्लील बोलल्यामुळे त्या दोघांमध्ये वाद […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवडमध्ये लॉजवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश…
पुणे : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी निगडीतील थरमॅक्स चौकातील एका लॉजमधून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दोन महिला आणि एका एजंटसह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या महिलेची पोलिसांनी सुटका केली आहे. पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, निगडीतील अंगण लॉजमधून कथित सेक्स रॅकेट चालवल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली […]
अधिक वाचा...सैराटची पुनरावृत्ती! दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या…
छत्रपती संभाजीनगर : प्रेमसंबंधावरून दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारात घडली आहे. चंद्रकला धोडिंबा बावस्कर (वय 35, रा. तोंडापूर, ता. जामनेर) असे मृत महिलेचे नाव असून, तर आरोपींमध्ये महिलेचा भाऊ कृष्णा धोडिंबा बावस्कर आणि शिवाजी धोडिंबा बावस्कर, वडील धोडिंबा सांडू बावस्कर आणि आई शेवंताबाई धोडिंबा बावस्कर समावेश आहे. […]
अधिक वाचा...दोन पत्नींसोबत एकत्र राहात असलेल्या पतीला एकीने पकडले अन्…
पाटणा (बिहार) : कौटुंबिक वादातून दोन पत्नींनी मिळून नवऱ्याची हत्या केल्याची घटना सारण जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी दोन्ही पत्नींना ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. आलमगीर अन्सारी (वय 45, रा. बेदवलिया) हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. आलमगीर अन्सारी याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याची पहिली पत्नी सलमा खातून आणि दुसरी पत्नी अमीना खातून या दोघींनाही ताब्यात […]
अधिक वाचा...दोन कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या माओवाद्यांच्या बड्या नेत्याला अटक…
मुंबई: दोन कोटी रुपयांचे बक्षीस जाहिर असलेल्या उच्चशिक्षित जहाल माओवादी नेत्याला तेलंगणामधून पोलिसांनी अटक केली आहे. संजय राव उर्फ दीपक असे या माओवाद्याचे नाव आहे. संजय याची पत्नीही माओवादी असून तिलाही बंगळूरूमधून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. संजय हा उच्चशिक्षित आहे. त्याने बीटेकपर्यंत शिक्षण घेतले आहे. तो गेल्या तीस वर्षांपासून माओवादी चळवळीत सक्रिय आहे. […]
अधिक वाचा...पुणे शहरातील मोक्कामधील फरारी आरोपीस युनिट ५ने केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): मोक्का केस मध्ये फरार असलेल्या आरोपीस जेरबंद करण्यात गुन्हे शाखा, युनिट-०५ ला यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरातील मोक्का, खुन, खुनाचा प्रयत्न या गुन्हयातील पाहिजे व फरार आरोपींना अटक करणेसाठी आदेशित केलेले होते. प्राप्त आदेशाप्रमाणे युनिट-५ कडील प्रभारी पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी व […]
अधिक वाचा...
