मी आत्ताच जेल मधून सुटून आलो आहे असे म्हणाला अन्…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी आरोपी पवन पेटेवार याच्या विरुद्ध घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घाटंजी तालुक्यातील तलाठी बिरमोल रामकृष्ण तायडे (वय 54, रा. खापरी) यांचे कार्यालयात शासकीय काम करत असतांना शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी आरोपी पवन पेटेवार (वय 55, रा. आनंद नगर घाटंजी विरुद्ध घाटंजी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 353, 186, 323, 504 व 506 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे हे पुढील तपास करीत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. २४) दुपारी 12.30 वाजता आरोपी पवन पेटेवार याने मी आत्ताच जेल मधून सुटून आलो आहे. मला लवकर 7/12 उतारा काढुन द्या, असे म्हणून जोरजोरात ओरडत होता. फिर्यादी बिरमोल तायडे यांनी आरोपी पवन पेटेवार यांस सांगितले की, ओरडू नको थोडं थांब, असे म्हटले असता, आरोपी पवन पेटेवार याने फिर्यादी बिरमोल तायडे हे शासकीय कामकाज करत असलेल्या टेबलावरील कागदपत्रे फेकून दिले. तसेच बिरमोल तायडे यांस शिवीगाळ करून गालावर थापडाने मारहाण केली. तुम्ही बाहेर निघा तुम्हाला मारुन टाकतो. तुमचे सोबत तुमचे कार्यालय जाळून टाकतो. तसेच तुम्ही कुठेही दिसला तर तुम्हाला मारुन टाकीन, अशी धमकी दिली. अशा लेखी तक्रारीवरुन घाटंजी पोलिस ठाण्यात आरोपी पवन पेटेवार विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटंजी पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे हे पुढील तपास करीत आहे.
हृदयद्रावक! दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावाला आल्या अन्…
हृदयद्रावक! आईने पोटच्या दोन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत: लाही संपवलं…
पोलिसांच्या गाडीला पाठीमागून जोरात धडक; दोन ठार…
अहमदनगर हादरले! महिला आणि चिमुकल्याच्या अंगावर कार घालून हत्या…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!