विकृती! मादी श्वानाशी अनैसर्गिक सेक्स करताना एकाने पाहिले अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश) : गौतमबुद्धनगर जिल्ह्यात एका 28 वर्षांचा युवक मादी श्वानाशी अनैसर्गिक सेक्स करत असल्याचे एका व्यक्तीने पाहिल्यानंतर त्याने श्वानाला थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिले. या घटनेत पीडित श्वान गंभीर जखमी झाली असून, तिला पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, युवकाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास अल्फा 2 भागात असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहात असलेला आरोपी बाल्कनीमध्ये मादी श्वानाशी अनैसर्गिक सेक्स करत होता. शेजाऱ्याने आरोपीला अनैसर्गिक सेक्स करताना पाहिल्यानंतर त्याने आराडाओरडा करायला सुरुवात केली. शेजाऱ्यांचा आरडाओरडा ऐकून आरोपीने मादी श्वानाला बाल्कनीतून थेट रस्त्यावर फेकून दिले. यामुळे श्वान गंभीर जखमी झाली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयातील वकिलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 377 (अनैसर्गिक लैंगिक संबंध) आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी एका कंपनीत काम करतो. घटनेच्या वेळी तो नशेच्या आहारी होता. प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा, 1960 अन्वयेही आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Video: मुंबईतील महिलेचे श्वानासोबत धक्कादायक कृत्य…

संतापजनक! श्वानाची चाकूने भोसकून हत्या; घटना सीसीटीव्हीत कैद…

कुत्रा सतत भुंकत असल्याने त्याच्या गुप्तांगात रॉड घुसवला अन् पुढे…

क्रूरता! कुत्र्याला बेदम मारहाण करत दिली फाशी…

क्रूरता! घोडींचे गुप्तांग शिवले तांब्याच्या तारेने…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!