विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीमधील टोळीवर मोक्का; ७२वी कारवाई…

पुणे (संदीप कद्रे): विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीमधील करण युवराज हतागळे (टोळी प्रमुख) व त्याचा ०१ साथीदार यांचे टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मकोका अंतर्गत केलेली ही ७२ वी कारवाई आहे.

विमानतळ पोलिस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं.५०७/२०२३ भा.दं.वि. कलम ३९४, ३४ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील दोन आरोपी यांनी ०२/१०/२०२३ रोजी फिर्यादी यांना पाहून ‘तुझा मित्र अरबाज कुठे आहे?’ असे म्हणून फिर्यादी यांना शिवीगाळ व हाताने मारहाण केली. तसेच फिर्यादी यांची कॉलर पकडून ‘चल दारू प्यायला पैसे दे’ असे सांगत असताना, फिर्यादी यांनी माझ्याकडे पैसे नाही असे म्हणाले असता, त्याचा राग मनात धरून, त्यांनी फिर्यादी यांचे पॅन्टचे खिशामध्ये जबरदस्तीने हात घालून १,७०० रूपये काढुन घेतले. त्याबाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्ह्याचे तपासा दरम्यान आरोपी
१. करण युवराज हतागळे, वय २६, रा. यमुनानगर वसाहत,विमाननगर,पुणे ( टोळी प्रमुख)
२. प्रविण युवराज हतागळे, वय – २१, रा. सदर ( टोळी सदस्य) (पाहिजे आरोपी) यांनी केला असल्याचे निष्पन्न झाल्याने अ. क्र. १ यास गुन्ह्याचे कामी अटक करण्यात
आले आहे.

निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची सुवर्णसंधी!

वरील आरोपीचे पुर्व रेकॉर्डची पाहणी करता, आरोपी करण युवराज हतागळे (टोळी प्रमुख) याचे विरुध्द एकुण ०७ गुन्हे दाखल असुन, आरोपी प्रविण हतागळे याचेविरुध्द ०२ गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपी यांनी एकत्रितरित्या गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झालेले आहे. यातील टोळीप्रमुख करण हतागळे याने त्याचे साथीदारासह स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी, संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणून किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा
संयुक्तपणे, गंभीर दुखापत, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, विनयभंग, खंडणी, घातक शस्त्रे जवळ बाळगणे, दरोडा,सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अशा प्रकारचे गुन्हे करुन सर्वसामान्य जनते मध्ये दहशत निर्माण केली आहे. यातील नमुद आरोपी यांचेविरुध्द वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा गुन्हे केलेले आहेत. दाखल गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii).३(२), ३(४) प्रमाणे चा अंतर्भाव करणेसाठी विमानतळ पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांनी पोलिस उप आयुक्त परीमंडळ-०४, पुणे शहर, शशिकांत बोराटे यांचे मार्फतीने अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता.

सदर प्रकरणाची छाननी करुन विमानतळ पोलिस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. ५०७/२०२३ भा.दं.वि.कलम ३९४,३४ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३(१)(ii).३(२),३(४) प्रमाणे चा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर रंजनकुमार शर्मा यांनी मंजुरी दिलेली आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास मा.सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर, श्री संजय पाटील हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर रंजन कुमार शर्मा, पोलिस उप आयुक्त, परीमंडळ – ०४, पुणे शहर, शशिकांत बोराटे, सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग,पुणे शहर, संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विमानतळ पोलिस स्टेशन, पुणे, विलास सोंडे, पोलिस निरीक्षक, गुन्हे, संगीता माळी, पोलिस उप-निरीक्षक, रविंद्र ढावरे, सर्व्हेलन्स पथकातील पोलिस उप-निरीक्षक, एस. एस. कोळ्ळुरे व पोलिस अंमलदार, उमेश धेंडे, म.पो. अमंलदार भोर, शिंदे, मांजरे व शेख यांनी केली आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे पोलिस आयुक्तालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व नागरीकां मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने कठोर पावले उचलण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शना खाली मकोका अंतर्गत केलेली ही ७२ वी कारवाई आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७१ वी कारवाई; पाहा आरोपींची नावे…

पुणे शहरातील मोक्कामधील फरारी आरोपीस युनिट ५ने केले जेरबंद…

‘तुला आम्ही खल्लासच करतो’ म्हणणाऱ्या आरोपींवर मोक्का कायद्यान्वये कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे एमपीडीए कारवाईचे अर्ध शतक…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!