
वाघोली पोलिस स्टेशन पुणे शहर तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी…
पुणे : वाघोली पोलिस स्टेशन पुणे शहर तपास पथकाने उल्लेखनीय कामगिरी करताना वाहन चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आणून १,४०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!
वाघोली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज हांडे यांचे मार्गदर्शन खाली व आत्माराम शेटे पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांचे सूचनाप्रमाणे वाघोली पोलिस स्टेशन कडील तपास पथक अधिकारी व पोलिस अंमलदार गणेशोत्सव व वाहन चोरी प्रतिबंध अनुषंगाने तपास करत असताना पो.अं. अमोल सरतापे, अशोक शेळके, गहिनीनाथ बोयणे यांना मिळालेल्या गुप्त बातमी च्या आधारे ३ आरोपींना अटक करून खालील गुन्हे उघडकीस आणले आहेत….
१) वाघोली पो स्टे गु.र.नं. ४४२/२०२५
२) वाघोली पो स्टे गु.र.नं.४६१/२०२५,
३) मुंढवा पो स्टे, गु.र.नं.२२३/२०२५
वाहन चोरीचे ३ गुन्हे उघडकीस आणून १,४०,००० /-रु.किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, मनोज पाटील अप्पर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, सोमय मुंडे पोलिस उप आयुक्त परिमंडळ ४, प्रांजली सोनवणे सहा. पोलिस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज हांडे, आत्माराम शेटे, पोलिस निरीक्षक (गुन्हे), वाघोली पो स्टे तपास अधिकारी पो उपनि मनोज बागल, पो.अं.रमेश साबळे, बाबासाहेब मोराळे, राम ठोंबरे, प्रदीप मोटे, अमोल सरतापे, अशोक शेळके, गहिनिनाथ बोयने, मंगेश जाधव, सुनील कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, साई रोकडे, विशाल गायकवाड, दीपक कोकरे, मारुती वाघमारे, प्रीतम वाघ, शिवाजी चव्हाण यांनी केली आहे.
आंदेकर X कोमकर! पुणे पोलिसांनी आंदेकर टोळी विरोधात केली मोठी कारवाई…
आंदेकर X कोमकर! आयुषच्या पार्थिवाला अग्नी देताना बाप ढसाढसा रडला तर हातामध्ये…
पुणे! गौतमची पाच दिवस मृत्यूशी झुंज; कुत्र्यावर दया अन् केसं-दाढी…
पुणे शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा…
पुणे पोलिसांनी सराईत गुन्हेगारास गावठी पिस्टलसह केले जेरबंद…

