सहकारनगर पोलिसांनी दोन सराईत गुंडांना केले जेरबंद…

पुणे (संदीप कद्रे): खुनाच्या प्रयत्नातील २ सराईत गुंडांना सहकारनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

२५/१०/२०२३ रोजी रात्रौ ०८.३० वा सुमारास बालाजीनगर येथील शिळीमकर पेट्रोल पंप जवळ फिर्यादी आकाश मारुती सोनावणे अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी यांना जुन्या भांडणाच्या कारणावरुन भांडणात मध्यस्थी करतोस काय, जास्त शहाणा झालास का, याला मारून टाकू, याला आता संपवायचाच असे बोलून बबलू कोठारी, सल्या शेख, सनी जाधव यांनी संगनमत करून जिवे मारण्याच्या हेतुने कोयत्याने वार केले. हातातील कोयते, बांबू हवेत फिरवून आजूबाजूच्या लोकांसमोर आम्हीच इथले भाई आहोत. कोणी नडला तर त्याला तोडणारच असे जोरजोराने ओरडून दहशत केली व त्यानंतर ते सर्वजण गाडीवर बसून तेथून निघून गेले. त्याबाबत सहकारनगर पोलिस ठाणे येथे गुरनं २७७ / २०२३ भा.द.वि. कलम ३०७,३२३,५०४,५०६, आर्म अॅक्ट ४ (२५). मपोका. कलम ३७(१)(३) सह १३५ क्रिमीनल अमेंडमेंट अॅक्ट कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्हा करून सर्व आरोपी फरारी होते.

निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची सुवर्णसंधी!

२६/१०/२०२३ रोजी सहकारनगर पोलिस स्टेशन तपास पथकातील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार असे सहकारनगर पोलिस ठाणे येथे हजर असताना पोलिस अंमलदार सुशांत फरांदे यांच्या गोपनीय बातमीनुसार आरोपी बबलू कोठारी यास अरण्येश्वर मंदिरा जवळून ताब्यात घेवून दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
बबलू तसेच याच गुन्हयातील फरार असलेला सराईत गुन्हेगार सलमान उर्फ सल्या शेख याचा शोध घेत असताना पोलिस अंमलदार अमोल पवार व निलेश शिवतरे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हयांत फरार असलेला आरोपी सल्या शेख हा घातक हत्यारासह के. के. मार्केट येथील पेट्रोल पंपाशेजारी असून तो काहीतरी गुन्हा करण्याच्या इरादयाने थांबला आहे.

खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे सहकारनगर पोलिस स्टेशन यांना कळविली असता त्यांनी लागलीच पो उपनिरी. राहुल खंडाळे व अंमलदार यांची टीम तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी जावून कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले. त्यानुसार सहकारनगर पोलिस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन छापा टाकून आरोपीस ताब्यात घेतले. सलमान ऊर्फ सल्ल्या हमीद शेख (वय २४ वर्षे रा. चैत्रबन वसाहत गल्ली नंबर ११, माताजी सुपर मार्केट समोर अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी पुणे) असे त्याचे नाव आहे. त्याची झडती घेता त्याचे कंबरेला एक लोखंडी कोयता मिळून आल्याने त्याच्यावर सहकारनगर पोलिस ठाणे येथे गुरनं २७८ / २०२३ प्रमाणे भारतीय हत्यारबंदी कायदा कलम ४ सह २५,
महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याच्याकडे सहकारनगर पोलिस ठाणे येथे गुरनं २७७ / २०२३ दाखल गुन्हयाच्या अनुशंगाने विश्वसात घेवून चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार बबलू कोठारी, सनी जाधव यांच्यासह केल्याचे कबुल केल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

सदर आरोपी सलमान ऊर्फ सल्ल्या शेख हा आदेश बिरामणे टोळीचा सदस्य असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, जबरी दुखापत, माराभारी अशा प्रकारचे एकुण ७ गुन्हे सहकारनगर व भारती विदयापीठ पोलिस स्टेशन येथे दाखल असून त्याच्यावर आता पर्यंत १ वेळा मोका कायदया प्रमाणे कारवाई करण्यांत आली आहे तसेच वैभव ऊर्फ बबलू कोठारी त्याच्यावर मारामारीचा १ गुन्हा सहकारनगर पोलिस स्टेशन येथे दाखल आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलिस उप निरीक्षक राहुल खंडाळे करीत आहेत.

सदरची कामगीरी अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त परिमंडळ – २, स्मार्तना पाटील, सहा. पोलिस आयुक्त स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदीप देशमाने सहकारनगर पोलिस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलिस स्टेशन तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलिस अंमलदार अमोल पवार, सुशांत फरांदे, निलेश शिवतारे, संजय गायकवाड, महेश मंडलिक, सागर सुतकर, बजरंग पवार, नवनाथ शिंदे, भुजंग इंगळे, सागर कुंभार, विशाल वाघ यांनी केली आहे.

पुणे शहरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई; कोट्यावधींचा मुद्देमाल हस्तगत…

गर्लफ्रेंन्डला इंप्रेस करण्यासाठी चोरले तब्बल १५ मोबाईल अन्…

विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीमधील टोळीवर मोक्का; ७२वी कारवाई…

पुणे शहरात जवानाने घातला पोलिसाच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!