पुणे शहरात जवानाने घातला पोलिसाच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक…

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ दीड महिन्यांपूर्वी वाहतूक नियमन करत असताना पोलिस आणि लष्करात कार्यरत असलेल्या जवानाची बाचाबाची झाली होती. त्याचा राग मनात ठेवून बुधवारी (ता. २५) जवानाने पोलिसाच्या डोक्यात घातला सिमेंट ब्लॉक घातल्याची घटना घडली आहे. यामध्ये पोलिस कर्मचारी रमेश ढावरे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. वैभव संभाजी मनगुटे असे जवानाचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची सुवर्णसंधी!

पोलिस कर्मचारी रमेश ढावरे हे दीड महिन्यांपूर्वी वाहतुकीचे नियमन करत होते. दुचाकीवरून तिघेजण जात असल्यामुळे त्यांनी दंडात्मक कारवाई केली होती. यावेळी बाचाबाची झाली होती. कारवाई केल्याचा राग मनात धरून आरोपी वैभव मनगुटे याने बदला घेण्याच्या उद्देशाने रमेश ढावरे यांचा शोध घेतला. बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ढावरे हे बुधवार चौकात वाहतुकीचे नियमन करत होते. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आला. त्याने ढावरे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने सिमेंटचा ब्लॉक ढावरे यांच्या डोक्यात जोरात मारला. यामध्ये ढावरे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

वैभव मनगुटे सुटीवर गावी आला असून, तो छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यातील रहिवाशी आहे. या प्रकरणात वैभव मनगुटे याला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम 307, 332, 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरासखाना पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या रमेश डावरे यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरात संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती; अनेक गाड्यांना उडवले…

हृदयद्रावक Video! पुणे शहरात जुळ्या मुलींचा एकाचवेळी दुर्देवी मृत्यू…

पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…

पुणे शहरात बुलेट सायलेन्सरमधून आवाज काढणाऱ्यांवर कारवाई…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!