पुणे शहरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई; कोट्यावधींचा मुद्देमाल हस्तगत…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात धारदार हत्यारांसह दरोडा, घरफोडी करणा-या टोळीस गुन्हे शाखेने अटक करून टोळीकडून सव्वाकिलो सोन्याचे दागिने, एक किलो चांदी, ०३ पिस्टल, १४ जिवंत राऊंड, चोरीची एकुण १० वाहने (०६ चारचाकी व ०४ दुचाकी वाहने) असा एकूण १,२२,४४,००० रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

०९/०९/२०२३ रोजी हडपसर पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नंबर १३४५/२०२३, भा.दं.वि.क. ३९५,३९७, ५०४, ५०६, आर्म अॅक्ट कलम ३(२५) महाराष्ट्र पो.अधि कलम ३७(१) (३) सह १३५ या गुन्हयातील आरोपी हे गुन्हयात वापरलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीसह फुरसुंगी गावातील सोनार पुलाजवळील झाडींमध्ये असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शाखा, युनिट-३ ला प्राप्त झाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा, युनिट ३, पुणे शहर वपोनि श्रीहरी बहिरट यांनी गुन्हे शाखा, युनिट ३ कडील पोलिस अधिकारी व अंमलदार सदर ठिकाणी पोहचले. तेथील भौगोलिक परीस्थिती पाहता आणखी पोलिसांची कुमक आवश्यक असल्याने त्यांनी मिळालेल्या बातमी व पोलिस मदतीबाबत अमोल झेंडे, पोलिस उप आयुक्त, गुन्हे यांना कळविले असता ते तात्काळ सुनिल तांबे, सपोआ गुन्हे १, पुणे शहर तसेच युनिट २, खंडणी विरोधी पथक १, दरोडा व वाहनचोरी पथक – ०१ कडील पोलिस अधिकारी व अंमलदार यांचेसह सदर ठिकाणी आले.

घटनास्थळावरील झाडी तसेच रात्रीची वेळ असल्याने पोलिसांनी तीन पथके तयार करून मिळालेल्या बातमीचे ठिकाणी नियोजनबध्द सापळा लावला. नमुद पोलिस पथकांनी विभागून सदर परीसरास झाडीमध्ये असलेल्या पांढ-या रंगाच्या स्विफ्ट गाडीला घेराव घातला. गाडीच्या जवळ जात असता त्यांना पोलिसांची चाहुल लागल्याने गाडीच्या बाहेर असलेले दोन आरोपी पळून जावू लागले व एका आरोपीस पळून जाता न आल्याने गाडी लॉक करून गाडीमध्ये लपून बसला. पोलिसांच्या एका पथकाने गाडीजवळ जावून गाडी लॉक असल्याने गाडीची काच फोडून त्यास ताब्यात घेतले व इतर दोन पथकानी पळून जात असलेल्या आरोपींचा रात्रीच्या अंधारात घनदाट झाडींमधून पाठलाग करून त्यांना पकडले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे
१) अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी, वय-२३ वर्षे, रा.बहात्तर वस्ती, मांजरी, पुणे
२) बच्चनसिंग जोगीदरसिंग भोंड, वय-२५ वर्षे, रा. गोसावी वस्ती, बिराजदार नगर, लेन नं. ७, वैदवाडी, पुणे व एक विधीसंघर्षीत बालक अशी आहेत.

निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची सुवर्णसंधी!

नमुद आरोपींकडून ०३ पिस्टल, १४ जिवंत राऊंड, ०२ मोबाईल हॅन्डसेट, तसेच त्यांचे ताब्यातील गाडीमध्ये एकुण ०४ लोखंडी कटावणी, ०१ लोखंडी कोयता, ०८ स्क्रु ड्रायव्हर, ०२ लोखंडी कटर, ०४ कात्री, ०४ नंबर प्लेट, ०१ वजनकाटा, ०१ चार्जेबल बॅटरी, ०१ पोपट पाना, व कागदपत्रे असा माल मिळून आला आहे.
नमुद आरोपींकडे केले तपासात त्यांनी दाखल गुन्हा हा त्यांचे साथीदार
४. तिलकसिंग गब्बरसिंग टाक (रा. रामटेकडी, हडपसर, पुणे)
५. रामजितसिंग रणजितसिंग टाक, (रा. रामनगर, हडपसर, पुणे)
६. अक्षयसिंग बिहसिंग टाक रा- हडपसर, पुणे
७. करणसिंग रजपूतसिंग दुधाणी, रा. हडपसर, पुणे
८.राहूलसिंग रविंद्रसिंग भोंड रा. हडपसर, पुणे
९. कणवरसिंग काळूसिंग टाक, रा. हडपसर, पुणे
१०. लखनसिंग राजपूतसिंग दुधाणी, रा.रामटेकडी, हडपसर, पुणे
११. सोहेल जावेद शेख, रा. गोसावी वस्ती, हडपसर, पुणे यांचेसह केल्याचे तपासात निष्पन्न झालेले असून, त्यामधील अ.क्र.५ व ९ यांना गुन्हे शाखा, युनिट-५ यांनी ताब्यात घेतले आहे. तसेच अन्य आरोपींचा शोध चालु आहे.

नमुद आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभुमी पाहता पोलिस उप आयुक्त, गुन्हे यांनी सुनिल तांबे सपोआ गुन्हे १ यांच्या निगरानीखाली गुन्हे शाखेकडील ०३ पोलिस निरीक्षक, ०५ पोलिस उप निरीक्षक व १७ पोलिस अंमलदार यांचे तपास पथके बनवून अधिक गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या. वर नमुद अटक आरोपी व त्यांचा घरफोडी चोरीतील साथीदार मनिष बाबुलाल कुशवाह (वय २५ वर्षे रा. स. नं. ८२, कॅनोलजवळ, हिंगणेमळा, हडपसर, पुणे मुळ गाव धुंदीपुरा थाना केलारेस, जि. मोरेना राज्य मध्य प्रदेश) यांचेकडे एकत्रित केले तपासामध्ये त्यांनी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण या भागात घरफोडी चोरी केल्याचे कबुल केले आहे. त्यांचेकडून अदयापपर्यत १,२३० ग्रॅम वजनाचे ८०,१५,०००/- रू चे सोन्याचे दागिने, १,०४६ ग्रॅम वजनाचे ७८,०००/- रू चे चांदीचे दागिने, रोख रक्कम ६०,०००/- रूपये, तसेच ०६ चारचाकी वाहने किं. रू.३४,६५,०००/- च्या व ०४ दुचाकी वाहने ३,६५,०००/- रूच्या, ०३ पिस्टल, १४ राऊंड किं. रू. १,००,०००/- च्या ०४ मोबाईल हॅन्डसेट किं. रू.५०,०००/- चे, इतर मुददेमाल असा एकुण १,२२,४४,०००/- किंमतीचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्यांचेकडून पुणे पोलिस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड तसेच पुणे ग्रामिण हददीतील एकुण १७३ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. उघडकीस आलेले गुन्हे व आरोपींचा पुर्व अभिलेख स्वतंत्र जोडलेला आहे.

नमुद गुन्हा तसेच अन्य घरफोडी चोरीच्या गुन्हयांमध्ये प्रत्यक्षात गुन्हे करणारे एकूण ६ आरोपी अटक करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त आरोपी
१) संतोष शिवाजी पारगे वय ४५ वर्षे रा. मगरपटटा हडपसर, पुणे
२) गोपीनाथ जालींदर बोराडे, वय २९ वर्षे, रा. मु. पो. वरवंड, ता. दौंड, जि. पुणे सध्या रा. फ्लॅट नंबर १००४, एच विंग, ज्वाईनेस्ट सोसा. लोणीकाळभोर, पुणे व चोरीचा मुददेमाल स्विकारणारे
३) रोहितसिंग सुरेंद्रसिंग जुनी वय २२ वर्षे, रा. १५ नंबर कॉलनी, गंगानगर, फुरसुंगी, हडपसर, पुणे,
४) आरती मंगलसिंग टाक वय ३२ वर्षे, रा. महात्मा फुले वसाहत, कॅनोल शेजारी, गाडीतळ, हडपसर, पुणे,
५) कविता मन्नुसिंग टाक वय ३० वर्षे, रा. तुळजाभवानी वसाहत, कॅनोलशेजारी, गाडीतळ, हडपसर, पुणे असे मिळून एकुण ११ आरोपींना अटक करण्यात आलेली असून पाहिजे आरोपींचा शोध चालु आहे. हडपसर पोलिस स्टेशन पुणे शहर गुन्हा रजि. नंबर १३४५/२०२३, भा.दं.वि. कलम ३९५,३९७,५०४, ५०६, आर्म अॅक्ट कलम ३ (२५) महाराष्ट्र पो.अधि कलम ३७ (१)(३) सह १३५ या गुन्हयातील एकूण ११ आरोपीविरोधात मोका कायदयान्वये कारवाई करण्यात आलेली आहे. नमुद आरोपी यांचेकडून उघडकीस आलेले गुन्हे (एकूण १७३).

सदरची कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त, संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त, (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलिस उपआयुक्त, (गुन्हे), अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शन व सुचनेनुसार सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे – १, गुन्हे शाखा, सुनिल तांबे, युनिट-०३ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, श्रीहरी बहिरट, खंडणी विरोधी पथक-१,गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, दरोडा व वाहनचोरी पथक-१, गुन्हे शाखा चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर तसेच युनिट- ०३ कडील पोलिस उप-निरीक्षक, राहुल पवार, अजितकुमार पाटील, राजेंद्र पाटोळे, विकास जाधव, शाहीद शेख, तसेच पोलिस अंमलदार, संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, शरद वाकसे, उत्तम तारू, गणेश ढगे, संजय भापकर, सयाजी चव्हाण, किरण ठवरे, दुर्योधन गुरव, संभाजी गंगावणे, किरण पवार, संजिव कळंबे, सुरेंद्र साबळे, सुजीत पवार, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिंदे, साई कारके, दिपक क्षिरसागर, राकेश टेकावडे, सतीशकत्राळे, प्रकाश कटटे, निखिल जाधव, साईनाथ पाटील, प्रताप पडवाळ, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांनी केली आहे.

विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीमधील टोळीवर मोक्का; ७२वी कारवाई…

गर्लफ्रेंन्डला इंप्रेस करण्यासाठी चोरले तब्बल १५ मोबाईल अन्…

पुणे शहरात जवानाने घातला पोलिसाच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक…

पुणे शहरात संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती; अनेक गाड्यांना उडवले…

पुणे शहरात बुलेट सायलेन्सरमधून आवाज काढणाऱ्यांवर कारवाई…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!