चुलतीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती चुलत्याला समजली अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका युवकाचे चुलतीसोबत प्रेम संबंध होते. चुलत्याला याबाबतची माहिती समजल्यानंतर पुतण्याने चुलत्याची निर्घृण हत्या केल्याची घटना पिलीभीत जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी पुतण्याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गजरौला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उगनपूर येथील रहिवासी नंदलाल (वय 28) याचा मृतदेह सकाळच्या सुमारास त्याच्या शेतात आढळून आला होता. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला होता. अहवाल हाती आल्यानंतर नंदलालचा मृत्यू हा जखमांमुळे झाला असल्याचे स्पष्ट झाले. पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
मृत नंदलाल हा उत्तराखंड मधील रुद्रपूर येथील एका कारखान्यात मजुरी करत होता. त्याची पत्नी (वय २५) बरखेडातल्या दौलापूर येथे राहत होती. ही घटना घडण्यापूर्वी तीन दिवस नंदलाल गावी आला होता. एक वर्षांपूर्वी नंदलालला या प्रेम प्रकरणाची माहिती मिळाली होती. त्यानंतर काका आणि पुतण्या आकाश यांच्यात वाद झाला होता. घटनेच्या दिवशी रात्री दोघांमध्ये घराबाहेर पुन्हा वाद झाला. त्यावेळी आकाशने नंदलालच्या डोक्यात जोरात काठी मारली. यात नंदलालचा जागीच मृत्यू झाला. चुलत्याची हत्या केल्यानंतर आकाश रात्री घरी येऊन झोपला होता
दरम्यान, संशयावरून पोलिसांनी नंदलालचा पुतण्या आकाशला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. आकाशने चुलता नंदलालची हत्या केल्याची कबूल दिली. माझे नंदलालच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचे त्याने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
संतापजनक! चुलत्याने सहा महिन्यांच्या चिमुकलीवर केला बलात्कार…
व्याही आणि विहीणमध्ये जुळले प्रेमसंबंध; पळूनही गेले पण…
प्रेमविवाहानंतर नवऱ्यासह पाच जणांचा काढला काटा; गूढ उकलले…
एकतर्फी प्रेमातून युवतीवर बलात्कार करून केला खून अन् मृतदेह…
प्रेमी युगुलाने आत्महत्येसाठी निवडली हॉटेलमधील रूम नंबर 305ची खोली…