एकाच कुटुंबातील सात जणांनी घेतला जगाचा निरोप…
सुरत (गुजरात) : एकाच कुटुंबातील सात जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पालनपूर पाटिया परिसरातील सिद्धेश्वर सोसायटीमधील आहे.
कुटुंबातील सहा जणांनी शुक्रवारी मध्यरात्री विष पिलं तर एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाचवेळी सात जणांनी आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण पुढे आलेले नसून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
सुरतच्या पालनपूर पाटिया परिसरातील सिद्धेश्वर सोसायटीमध्ये राहात असलेल्या एकाच कुटुंबातील सात जणांनी जगाचा निरोप घेतला. मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनाही समोरच दृष्य पाहून धक्का बसला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
दरम्यान, आत्महत्या केलेल्या कुटुंबियांचे त्याच इमारतीमध्ये चार फ्लॅट होते. कुटुंबियांनी आर्थिक तंगीमधून आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. शिवाय, त्यांनी उधार दिलेले पैसे परत मिळत नसल्यामुळे आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहीले आहे. या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नवविवाहितेने हाताच्या तळव्यावर कारण लिहून केली आत्महत्या…
पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीची आत्महत्या…
विद्यार्थ्याने फीसाठी पैसे नसल्याने केली आत्महत्या; चिठ्ठीत लिहीले की…
पोलिसकाकाची घराच्या अंगणात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…
महिला डॉक्टरची सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, गुन्हा दाखल…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!