विवाहित प्रेयसीला लॉजमध्ये घेऊन गेला अन् पुढे काही वेळातच…

नवी दिल्ली : दिल्लीच्या जाफ्राबाद भागात असलेल्या ओयो हॉटेलच्या एका रूममध्ये प्रेमी युगलाने आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. सोहराब (वय 28) व आयेशा (वय 27) अशी मृतांची नावे आहेत. मृत महिला विवाहित होती आणि तिला दोन मुलेही आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मृत सोहराब व आयेशा यांनी चार तासांसाठी हॉटेलची रूम बुक केली होती. यानंतर सोहराब याने आयशाचा गळा आवळून तिचा खून केला व स्वतः आत्महत्या केली. घटनास्थळावर पोलिसांना अर्ध्या पानाची सुसाईड नोटही मिळाली आहे. सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, ‘आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम असून आम्ही एकत्रितपणे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

सोहराब व आयेशा या दोघांना हॉटेलच्या रूममध्ये जाऊन चार तासांपेक्षा जास्त कालावधी झाला होता. पण, दोघं त्यानंतरही बाहेर न आल्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा वाजवला; पण रूममधून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि त्यांच्या उपस्थितीत रूम उघडली. तेव्हा रुममध्ये सोहराबचा मृतदेह सीलिंग फॅनला नायलॉनच्या दोरीने लटकलेल्या अवस्थेत होता. आयेशा बेडवर मृतावस्थेत आढळून आली. तिच्या गळ्यावर दाबल्याच्या खुणा आढळल्या. पलंगावर अर्ध्या पानाची हाताने लिहिलेली सुसाइड नोट आढळली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मौजपूर मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या ओयो हॉटेलमध्ये एका रूमचा दरवाजा उघडला जात नसल्याची माहिती मिळाली होती. घटनास्थळावर गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. मृत महिला विवाहित असून तिला 9 वर्षांचा मुलगा आणि 4 वर्षांची मुलगी आहे.’ दरम्यान, या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. परिसरामध्ये या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.

प्रेयसीची गळा चिरून हत्या करणाऱ्या आरोपीचाही जंगलात शेवट…

धक्कादायक! प्रियकर आणि प्रेयसीने चिरले एकमेकांचे गळे…

प्रेयसीला फ्लॅटवर शेवटचं भेटायला बोलावलं अन्…

प्रेयसीला म्हणाला; पोटात असलेल्या माझ्या बाळाला जन्म दे अन्…

प्रियकर आणि प्रेयसी ओयो हॉटेलमध्ये अन् काही वेळानंतर…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!