
पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’
पुणे : पोलिसाच्या कणखर मनातही दडलेला असतो एक कवी, लेखक, गायक आणि हरहुन्नरी कलाकारही. ऊन, वारा, पाऊस, थंडी झेलत राहते ती वर्दी. अहोरात्र आपल्या मदतीसाठी तत्पर असतात ते पोलिस. पोलिस आपले कर्तव्य पार पाडत असताना त्यांना मोठी साथ लाभते ती कुटुंबाची. कुटुंबातील प्रियजनांबाबत आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी पोलिसकाकाच्या वतीने ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’ हे पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे.
राज्यात लाखो पोलिस रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य पार पाडताना दिसतात. यामध्ये पुरुष, महिला पोलिसांचाही समावेश असतो. पोलिसांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झालेली असते. पोलिसांमुळे अनेकांना न्याय मिळतो. सण, समारंभ, वाढदिवस सोडून पोलिस आपले कर्तव्य पार पाडताना दिसतात. कोरोनाच्या काळामध्ये तर फक्त पोलिसच रस्त्यावर असल्याचे आपण अनुभवले आहे. पोलिसांना (महिला/पुरुष) हे सर्व करत असताना कुटुंबाची साथ असल्याशिवाय शक्य होणार नाही.
कुटुंबातील प्रियजनांची साथ लाभल्यामुळे वर्दी अंगावर चढलेली असते. प्रियजनांनी आपल्यासाठी खूप काही केलेले असते. आपणही त्यांचे काही देणे लागतो, या भावनेतून प्रेमाचे चार शब्द त्यांच्यासाठी लिहू शकतो. संबंधित पुस्तकामध्ये २० जणाचे लेख घेतले जाणार असून, प्रत्येकाला १० पाने दिली जाणार आहेत. प्रत्येकजण या दहा पानांमध्ये आपल्या प्रियजणांची छायाचित्रे व थोडक्यात माहिती देऊ शकणार आहे.
‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’ या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान प्रियजनांचा सन्मान केला जाणार आहे. आजच ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’ या पुस्तकासाठी आपले स्थान निश्चित करा आणि प्रियजनांच्या भावनांना वाट मोकळी करून द्या. आपल्याकडून आलेले लेख आमच्या संपादकीय विभागाकडून पुन्हा एडिट केले जाणार आहेत. त्यामुळे आपल्या शब्दात अथवा आमच्या टीमकडून लिहून घेऊ शकता. गुगल फॉर्म भरून ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’ पुस्तकात लेखक म्हणून स्थान निश्चित करा.
दरम्यान, पोलिसकाकाच्या वतीने पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मुलाखतींवर विविध पुस्तके प्रकाशित करण्यात आली असून, एका पुस्तकाचे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
Only WhatsApp: 93712 69949
Email : policekaka100@gmail.com
फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
डिजिटल मीडियासाठी वाचनीय मजकूर आवश्यक : संतोष धायबर
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!
पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!
पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे : जिद्द आणि यश खेचून आणणारा अधिकारी!