Video: शिमलातील शिव मंदिर कोसळून नऊ जणांचा मृ्त्यू तर अनेकजण…

शिमला (हिमाचल प्रदेश): शिमल्यामध्ये भूस्खलन झाल्यानंतर शिव मंदिर कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. समरहिल येथील बाळूगंजच्या शिव बावडी मंदिराजवळ दरड कोसळून शिवमंदिर दरडीखाली गाडले गेले. दरडीखाली 20 ते 25 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

आज सोमवार असल्याने शिव मंदिरात मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी असते. आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. येथे सध्या बचावकार्य सुरू आहे.

हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी ट्विट करून या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखालून नऊ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. श्रावणी सोमवार असल्याने मोठ्या संख्येने भाविक मंदिरात पोहोचले होते. दुसरीकडे, शिमल्याच्या लाल कोठीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

शिमलाचे पोलिस अधीक्षक संजीव कुमार गांधी यांनी सांगितले की, ‘भूस्खलनात एक शिव मंदिर कोसळले आहे. त्यामुळे आजूबाजूच्या इमारतींनाही धोका निर्माण झाला आहे. अनेक लोक अडकले आहेत. परिसरात बचावकार्य सुरू आहे.’

प्रेमविवाह! पोलिसांना मोटारीचा दरवाजा उघडताच बसला धक्का…

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर हिने गरोदरपणाबाबत केला खुलासा…

इन्स्टाग्रामवर मैत्री झालेली युवती निघाली तृतीयपंथी अन् पुढे…

…अखेर भाजप नेत्या सना खान यांच्या हत्येचं गुढ उलगडलं

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!