
Video: कोंढवा पोलिसांकडून रमजान ईद निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन…
पुणे (संदिप कद्रे): कोंढवा पोलिस स्टेशन तर्फे कौसर बाग ग्राऊंड, कोंढवा पुणे या ठिकाणी मुस्लिम बांधवांचे रमजान ईद निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन गुरुवारी (ता. १४) सायंकाळी कोंढवा पोलिस स्टेशन तर्फे करण्यात आलेले होते.
सदर कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार, प्रवीण पवार सह पोलिस आयुक्त, मनोज पाटील अप्पर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, आर राजा पोलिस उप आयुक्त परिमंडळ 5, सहा पोलिस आयुक्त गणेश इंगळे वानवडी विभाग तसेच परिमंडळ ०५ मधील सर्व पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक त्यांचे गोपनीय अंमलदार व त्यांचे पो स्टे.हद्दीतील प्रतिष्ठित व्यक्ती, कोंढवा पोलिस स्टेशन कडील सर्व स्टाफ, गोपनीय अंमलदार कार्यक्रमाकरिता उपस्थित होते.
सदर कार्यक्रमांमध्ये माजी आमदार महादेव बाबर शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, माजी आमदार योगेश टिळेकर भाजपा पक्ष, आमदार चेतन तुपे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, माजी नगरसेवक गफुर पठाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, माजी नगरसेविका नंदाताई लोणकर, हसीना इनामदार, महाराष्ट्र ॲक्शन कमिटी अध्यक्ष जाहीद भाई शेख, मौलाना कारी इद्रिस, मौलाना सूफी अन्वर, मनसे पक्ष पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, शांतता कमिटी सदस्य अबिद सय्यद, पुणे शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष समीर अन्सार शेख, व इतर २००० ते २५०० असा जनसमुदाय हजर होता. सदर कार्यक्रम मध्ये सर्व विभागातील पत्रकार वर्ग हजर होता.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे कायदा सुव्यवस्था राखणे कामी करावयाच्या उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पोलिसांना डायल 112 यावर नियंत्रण कक्ष येते माहिती देऊन पोलिस प्रशासनास मदत करण्याबाबत आव्हान केले. कोणत्याही प्रकारच्या अडी अडचणी करीता पुणे शहर पोलिस प्रशासन हे सदैव नागरिकांच्या सेवेसाठी हजर असेल असे आश्वासन दिले.
पुनित बालन यांच्या वतीने पुणे पोलिस कल्याण निधीला ५ लाख रुपयांची देणगी…
पुणे पोलिसांची ड्रग्जनंतर दारूवर मोठी कारवाई…
Video: पुणे पोलिसांना 25 लाखांचे पारितोषिक : देवेंद्र फडणवीस
पुणे पोलिस आयुक्तपदाचा अमितेश कुमार यांनी स्विकारला पदभार…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…