
हडपसर पोलिस आणि सामाजिक सुरक्षा विभागाची अवैध धंद्यांवर कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): हडपसर पोलिस स्टेशन आणि सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेने अवैध धंद्यांवर संयुक्त कारवाई केली आहे. एकुण ६ कारवायांमध्ये २४ आरोपींना अटक करून २६, ७४० रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हडपसर पोलिस ठाणे हद्दीत अवैद्य धंद्याचे समुळ उच्चाटण करण्याकरीता राबवण्यात आलेल्या विशेष मोहीमे अंतर्गत केलेल्या कारवाई मध्ये हडपसर पोलिस स्टेशन आणि सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा यांनी केलेल्या ३ संयुक्त कारवाया या गाडीतळ, साडेसतरानळी भागातील चालू असलेल्या अवैद्य धंद्यावर केल्या. या कारवाई मध्ये २० आरोपी अटक करून त्यांचेकडून १३,६४०/- चा माल मुद्देमाल जप्त केला. तसेच हडपसर पोलिस स्टेशन स्तरावर केलेल्या इतर कारवाई मध्ये अवैद्य दारू विक्री २ कारवाया तसेच जुगार प्रमाणे एक कारवाई करून १३,१००/- चा मुद्देमाल जप्त करून ४ आरोपी यांना अटक केलेली आहे. अवैद्य धंद्यावरिल कारवाईमध्ये एकूण ६ केसेस दाखल करून २४ आरोपी अटक करून त्यांचेकडून २६, ७४० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त रितेश कुमार, रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग व आर राजा, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली अश्विनी राख, सहाय्यक पोलिस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, रविंद्र शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक हडपसर पोलिस स्टेशन, पुणे शहर, विश्वास डगळे, पोनि. (गुन्हे), संदीप शिवले, पोनि. (गुन्हे) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे, चेतन थोरबोले, प्रमोद दोरकर यांचे पथकाने केली आहे.

हडपसर पोलिसांनी चोरीचा गुन्हा उघड करून मुद्देमाल केला जप्त…
हडपसर तपास पथकाकडून अल्पवयीन मुले ताब्यात; घरफोडीचे गुन्हे उघड…
हडपसर पोलिसांना घरफोडी व वाहन चोरीचा गुन्हा उघड करण्यात यश…
हडपसर पोलिसांकडून परप्रांतीय टोळी गजाआड, लाखो रुपयांचे मोबाईल जप्त…
हडपसर पोलिस स्टेशनची दोन महिन्यात दुसरी मोक्का अंतर्गत कारवाई…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

