Happy Birthday! रियल लाईफ दबंग अधिकारी IPS सत्यसाई कार्तिक!

(उदय आठल्ये)
पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस दलातील लोणावळ्याचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई मधीरा कार्तिक यांचा आज (२२ जुलै) वाढदिवस. यानिमित्ताने पोलिस लेखक ‘उदय आठल्ये’ यांनी घेतलेला आढावा…

राज्यातील एक आगळे वेगळे अधिकारी म्हणून सत्यसाई कार्तिक हे ओळखले जातात. तरुणाईला लागलेली कीड म्हणजे ड्रग्ज. आजकालच्या तरुणांना भविष्याची काही फिकीरच उरलेली नाही. त्यांच्या वर्तनातूनच असे जाणवते. आपली मुले कुठे जातात, काय करतात, हे जाणणे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे. मुले वयात आल्यावर पालकांची जबाबदारी अधिक वाढते. दारू पिणे, रात्री-अपरात्री नशेत धिंगाणा करणे, पार्टी करणे यामध्ये उच्चस्तरीय मुलांप्रमाणेच मध्यमवर्गीय मुलांचेही प्रमाण वाढते आहे. अशा नशाबाजी हुक्का त्यातून त्यांची सुटका करणे आणि त्या व्यसनाच्या जाळ्यात अडकण्यापासून तरुणाईला रोखणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तेच कर्तव्य मानून लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी लोणावळा येथे संकल्प नशामूक्ती ही संकल्पना राबवली आहे. या संकल्पनेला उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून अनेक तरुणाई नशा मुक्त होण्यास सुरुवात झाली आहे, हे सर्वांनी पाहिले आहे. लोणावळा शहरात पर्यटनाच्या निमित्ताने राज्यभरातील तरुणाई गर्दी करते त्याचाच गैरफायदा घेत येथे ड्रग्जचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावत आहे, तो मुळासकट उपटून काढण्यासाठी संकल्प नशामुक्ती’ हे विशेष अभियान राबवले आहे. नशेबाबत विध्यार्थी व कॉलेज प्रशासनाला योग्यत्या सुचना देत कॉलेजमधील जे विद्यार्थी मध्य व अमंली पदार्थांच्या नशेच्या आहारी गेलेले आहेत त्यांची माहिती संकलीत करण्यात येणार आहे. कॉलेजमध्ये अशा प्रकारची कोणी नशा करत असल्यास अथवा अशी अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती असल्यास त्याबाबत पोलिस प्रशासनाला वैयक्तिक माहिती कळविण्याबाबत आवाहन करण्यात आहे. तरुणांचे प्रबोधन,आणि व्यसनाच्या आहारी गेलेल्यांचे पुनर्वसन अशा तीन मुद्यांवर पोलिस काम करत आहेत. त्यासाठी अभिनेता सुनील शेट्टी हे ब्रँड अँबेसिडर इनिशियेटिव्ह घेतले आहे.

अल्प परिचय..
क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी म्हणून ओळख असलेले सत्यसाई कार्तिक यांचा हा प्रवास. त्यांचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे‌. त्यांनी 2019 साली 103वी रँक मिळवत युपीएससीच्या परीक्षेत यश मिळवत महाराष्ट्र केडर मिळाले आहे. सध्या ते आय.पी.एस अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे देशाची सेवा करत आहेत. सत्यसाई कार्तिक यांचा जन्म तेलंगणा मधील हैदराबाद शहरात झाला. आई- प्रभा मधीरा कार्तिक वडील- श्रीनिवास मधीरा कार्तिक या दाम्पत्याच्या पोटी सत्यसाई कार्तिक यांचा सदन कुटुंबात जन्म झाला. लहानपणापासून हट्टी खेळकर वृत्तीचे असलेले कार्तिक यांना क्रिकेट खेळाची आवड जास्त होती‌. किंबहुना आपले करीअर क्रिकेटमध्ये घडवायचे असा इरादा देखील त्यांचा होता. त्यांच्या कारकीर्दीला अनपेक्षित वळण मिळण्यापूर्वी त्यांनी अंडर-13, अंडर-15, अंडर-17 आणि अंडर-19 स्तरांवर तसेच विद्यापीठ, राजय स्तरावर भरपूर क्रिकेट सामने खेळले आहेत.

शैक्षणिक प्रवास
सत्यसाई कार्तिक यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हैदराबादमध्ये पूर्ण झाले. कार्तिक हे इंजिनीअर’ पदवीधर असून, त्यांनी जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल विद्यापीठातून ‘कम्प्युटर सायन्स’ विषयात ‘इंजिनीअर’ पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांनी एका कंपनीत सुमारे 6 महिने काम केले. परंतु, त्यांना त्या नोकरीची आवड कमी होती. एकतर क्रिकेटची आवड असून दुखापतीमुळे क्रिकेटचा रस्ता बंद झाला होता. अशा वेळी काय निर्णय घेयचा ही वेळ आली असता कुटुंबातील सर्व जण त्यांच्या पाठीशी होते. चिकाटी आणि सयंम जवळ असल्यावर अपयश आले तरी खचून जायचे नाही. आपण कोणत्याही अपयशावर मात करू शकतो हा निर्धार ठेवून पुढे वाटचाल सूरू ठेवली. यूपीएससीची परीक्षा देऊन नागरी सेवा क्षेत्रात जाण्याचा विचार केला व तो सार्थ करून दाखवला.

यूपीएससीचा प्रवास…
यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू करण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या पुस्तकांपासून सुरुवात केली. NCERT च्या पुस्तकांच्या वाचनाने त्यांचा पाया तर मजबूत झालाच, शिवाय त्यांना वेगवेगळ्या विषयांची माहिती झाली आणि UPSC साठी आपल्याला कोणत्या प्रकारचा अभ्यास करायचा आहे हे देखील कळत गेले आणि सुरुवात झाली. आपल्या करिअरच्या टप्प्यावर सगळे पर्याय सोडलेले कार्तिक यांच्यावर मोठी जवाबदारी आली होती. IPS होण्यासाठी त्यांनी आपली मेहनत व जिद्द पणाला लावली. सुरवातीला किक्रेट पासुन अलिप्त झाले. शिक्षण पुर्ण करुन नोकरी सोडली. आता काय करणार म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी आपले सर्व प्रयत्न पणाला लावले. तरी देखील तिथेही अपयशाने पाठ सोडली नाही. एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल तीन वेळा यूपीएससी मध्ये अपयश आले. वारंवार नापास होण्याने दु:खी होण्याऐवजी कार्तिक यांनी धीर सोडला नाही. आणि तयारी सुरूच ठेवली. अखेरीस त्यांच्या चौथ्या प्रयत्नात, कार्तिक यांनी 2019 मधील यूपीएससी परीक्षेत 103 वा क्रमांक मिळवला व आपले आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले. प्रशिक्षणासाठी हैदराबाद येथे रवाना झाले. सुमारे दिड वर्षाच्या प्रशिक्षणानंतर महाराष्ट्र पोलिस दलात नियुक्ती.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

महाराष्ट्र पोलिस दलात खाकी वर्दीतील सेवेला सुरवात
– प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर सत्यसाई कार्तिक हे महाराष्ट्रातील सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील सोलापूर तालूका पोलिस स्टेशन येथे सन 2022 साली आपल्या प्रोबेशनची सुरवात केली
क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करण्यात महत्त्वाचे योगदान…
– सोलापुर तालुका पोलिस ठाणे यांनी दि.4/4/2022 ते 29/6/2022 पर्यंत स्वंतत्र प्रभारी अधिकारी म्हणुन कामकाज केले आहे.
– गुरनं 291/22 भादविक 302 मधील मौजे वडाळा येथील खुनाच्या गुन्ह्यात कोणताही पुरावा नसताना.त्या गुन्हयातील आरोपीस अटक करून गुन्ह्याचा तपास पुर्ण केला..
– दरोड्याचा गुन्ह्यांची उकल करून 3 आरोपी जेरबंद 10,6250/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला होता..
– गुरनं 421/22 भादविक 395 दि.4/6/2022 रोजी रात्री शेती रा. डोंबाळे वस्तीच्या जवळ उळेगाव ता. दक्षिण सोलापुर याचे वस्तीवर त्याच्या ओळखीचा एक व त्याच्या सोबत आलेल्या 4 लोकांनी मारूती शिंदे त्याची पत्नी व मावशी यांना तलवार व चाकुचा धाक दाखवुन त्यांच्याकडून सोन्याचे दागिने मोबाईल हॅन्डसेट व रोख रक्कम असा एकुण 10,6000/- रू किंमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला होता सदर बाबत पोलिस स्टेशन यथे दरोडयाचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयातील निष्पन्न व अनोळखी 4 इसमांचा गुन्हे प्रकटीकरणातील पोलिस अधिकारी व पोलिस अमंलदार यांनी शोध घेवुन 4 आरोपी व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना निष्पन्न केले आहे.3 आरोपी यांना अटक करून त्यांचेकडुन गुन्ह्यात वापरलेली तलवार, चाकु, चाबुक,व पक्कड सोन्याचे दागिने, व रोख रक्कम,असा मुद्देमाल हस्तगत केला..
– गुरनं 368/2022 भादविक 328 वगैरे अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारे दोन कंन्टेनर पकडुन त्यामध्ये एकुण 1 कोटी 74 हजार रूपये किंमतीचा गुटखा व 45 लाख रूपये किंमतीचे दोन कंटेनर असा एकुण 1 कोटी 45 लाख 74 हजार रू.किंमतीचा गुटखा जप्त केला आहे सदर गुन्हयाचा तपास स्वतः करून गुन्ह्यात एकुण 5 आरोपींना अटक करून त्यांच्याकडे तपास करण्यात आला.
– गुरनं 167 /2022 भादविक 279 ,304 अ कोंडीवडे येथे झालेल्या अपघातामध्ये सुरूवातीस 4 व त्यानंतर उपचारा दरम्यान 2 लोक असे एकुण 6 लोक मयत झाले होते त्या गुन्ह्यांचा उर्वरीत तपास पुर्ण केला.
– गुरनं 246 /2022 भादविक 354 (ड), आयटी अॅक्ट 67 (अ) – एक महीलाविषयक व माहीती तंत्रज्ञान अधिनियमान्वये दाखल असलेल्या गुन्हयाचा तपास केला.
– गुरनं 458/2022 भादविक 419,420, आयटी अॅक्ट 66 (सीडी) – एक महीलाविषयक व माहीती तंत्रज्ञान अधिनियमान्वये दाखल असलेल्या गुन्हयाचा तपास केला.
अवैध धंद्यांवर स्टाईलने कारवाई, जनता सुखावली बेकायदेशीर धंद्यावर कार्तिक यांनी आपल्या कार्यकाळात सोलापूर येथे कारवाईचा सिलसिला सुरू ठेवला.

अवैध हातभट्टी दारू –
तत्कालीन पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी सोलापुर ग्रामीण यांनी राबविलेल्या ऑपरेश परीवर्तन या मोहीम अंतर्गत पोलिस ठाणे कडील पोलिस अधिकारी व पोलिस अमंलदार यांचे करवी मुळेगावतांडा भानुदास तांडा, वजडीतांडा गुळवंचीतांडा, कोडीतांडा, सितारामतांडा व सेवालाल नगर या परीसरात चोरून चालणा-या अवैध हातभटटी व्यवसाय करणारे एकुण 95 इसमाविरूध्द 26 लाख 78 हजार 520 रू. किंमतीचे 1 लाख 4 हजार 30 लीटर गुळमिश्रीत रसायन नष्ट केले आहे.
जुगार कारवाई
अवैध जुगार खेळणारे एकुण 46 इसमाविरूध्द कारवाई त्यांच्यांकडुन एकुण 8 लाख 29 हजार 620 रू. किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे..
अवैध वाळू
अवैध वाळू उपसा करणा-या विरूध्द एकुण 8 गुन्हे दाखल करून 6 लाख 96 हजार 830 रू.किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे..
अवैधरित्या तांदुळाची वाहतुक
अवैधरित्या तांदुळाची वाहतुक करणारे 1 इसमाविरूध्द कारवाई करून 32 लाख 25 हजार रू.किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ऑर्केस्ट्रा बारवर छापा..
नान्नज येथिल विजयराज ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकुन 18 इसमाविरूध्द कारवाई करण्यात आली आहे…
अवैधरित्या दारूची विक्री
अवैधरित्या दारूची विक्री करणारे 12 इसमाविरूध्द 12 गुन्हे दाखल करून 53 हजार 475 रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

उपयुक्त सहभाग
ऑपरेश परीवर्तन-
तत्कालीन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते सोलापूर ग्रामीण यांनी राबविलेल्या ऑपरेशन परीवर्तन या मोहिमेत सहभाग घेतला..
बालविवाह प्रतिबंध
बालविवाहाची प्रथा मोडण्याकरीता मौजे कासेगाव मुळगाव व होनसळ या गावात बैठका घेऊन स्थानिक नागरिक /जनतेशी सुसंवाद साधुन बालविवाह रोखण्यासाठी मोठे प्रयत्न..
पोलिस मोफत आरोग्य तपासणी शिबीर
सोलापुर तालुका पोलिस ठाणे येथे कार्यरत असताना पोलिस अधिकारी व पोलिस अमंलदार यांना त्यांच्या व्यस्त दैनंदिन कामकाजामुळे त्यांच्या शरीराकडे दुर्लक्ष होऊन त्यातुन त्यांना एखादा गंभीर स्वरूपाचा आजार होऊ नये याकरीता त्यांची संपुर्ण मोफत आरोग्य तपासणी व्हावे यासाठी मोठे प्रयत्न केले.

स्वच्छता मोहीम
पोलिस स्टेशनचा परीसर स्वच्छ ठेवल्यामुळे पोलिस स्टेशन मध्ये येणा-या नागरिक / जनता पोलिस अमंलदार यांच्या आरोग्याचा निगा व्यवस्थितपणे राखली..
वृक्षारोपण –
जागतिक पर्यावरण दिना निमित्त पोलिस स्टेशनच्या परीसरात स्वतः कार्तिक यांनी सहभाग घेऊन पोलिस स्टेशन जवळ सर्वांनी वृक्षारोपण केले ..
सी.सी.टिव्हीचा वॉच
सोलापुर तालुका पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या गावामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास किंवा महिलाविषयक गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्या नंतर त्याची माहीती लवकर मिळावी म्हणून 6 गावातील नागरिकांशी समन्वय साधून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले..

प्रोबेशनेरी ते सहा.पोलिस अधीक्षक पदोन्नती लोणावळा येथे..
दि.19/10/2022 पासुन उपविभागीय पोलिस अधिकारी लोणावळा विभाग लोणावळा (पुणे ग्रामीण) येथे नियुक्ती करण्यात आली.लोणावळा येथील पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी संकल्प नशामूक्ती ही संकल्पना राबवली यामुळे अनेक युवक नशा मुक्त होण्यास मदत झाली..
युवकांमध्ये सध्या व्यसनाधिनता वाढत असुन व्यवसानच्या विळख्यात अडकलेल्या लोकांना व्यसनमुक्त करून त्यांना एक आरोग्यदायी जीवन जगता यावे यासाठी संकल्प नशामुक्ती अभियानाव्दारे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र पुणे या नावाजलेल्या संस्थेचे विद्यमाने चार मुदयावर काम चालु करण्यात आले होते..
अमंली पदार्थ विक्रेत्यावर पोलिसांकडुन कायदेशीर कारवाई..
व्यसनमुक्ती साठी पथनाटय लेक्चर्स मॅरेथॉन व्दारे लोकांनमध्ये जनजागृती..
व्यसनाधीन लोकांचे नियमित प्रबोधन
व्यसनधीन लोकांना व्यसनापासुन अलिप्त करून समाजाच्या मुख्या प्रवाहात पुनर्वसन करणे. तसेच या अभियानाच्या माध्यमातुन समाजात व्यसनमुक्ती चा संदेश देण्यासाठी व युवकामध्ये जनजागृती साठी 4 जुन 2023 रोजी लोणावळा येथल दाउदी बोहरा मैदावरून 5 किलो मीटर संकल्प नशामुक्ती मॅरेथॉन चे आयोजन करण्या आले होते..तसेच शाळा कॉलेज येथे संकल्प नशामुक्ती अभियान राबविण्यात आलेले आहेत विद्यार्थ्यांना या मोहीमे अंतर्गत व्यसनी युवकांना पुर्णपणे व्यवसनमुक्त करण्याचा संकल्प व निर्धार करण्यात आलेला आहे. लोणावळा उपविभागातील लोणावळा शहर लोणावळा ग्रामीण वडगाव मावळ कामशेत या पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील सर्व शाळा महाविदयाल मध्ये बीट अधिकारी व बीट अमंलदार यांच्याकडून प्रबोधन करण्यात आले.संकल्प नशामुक्तीचे अनुषंगाने एनडीपीस अॅक्ट अन्वये लोणावळा उपविभागातील पोलिस स्टेशन हद्दीत सेवन करणे व विक्री करणा-या 57 इसमांविरूध्द 50 गुन्हे दाखल करून 270200/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

वारसा स्वच्छतेचा,मावळा शिवरायांचा,गड किल्ले स्वच्छता मोहीम राबवली ‌..
पोलिसांच्या प्रती जनभावना चांगल्या होण्यासाठी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण पोलिस दलाचे मार्फतीने वारसा स्वच्छतेचा मावळा शिवरायांचा हे गड किल्ले स्वच्छता अभियान माहे एप्रिल 2023 पासुन चालु करण्यात आले होते. तसचे इंद्रायणी नदी पात्रातील जलपर्णी काढुन स्वच्छता करण्यात आली होती. तसेच स्वच्छता अभियानाच्या माध्यमातुन लोकांमध्ये विविध विषयावर जागृती करण्यासाठी स्वच्छता अभियान संपल्यानंतर उपस्थितांना पथनाटय किंवा तज्ञ व्यक्तींच्या मार्फतीने व्यसनमुक्ती सायबर सुरक्षा महीला सुरक्षा वाहतुक नियमन या सारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन करून जनजागृती केली आहे. या अभियानामध्ये किल्ले लोहगड तसेच पर्यटकांच्या लोणावरूहातील लोकपिय पर्यटनस्थळ असलेले टायगर पॉईट भुशी डॅम किल्ले तिकोना तसेच दुस-या पर्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथल सर्व महापुरूषांचे पुतळे व परीसराची स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातुन लोकांमध्ये विविध विषयावर जागृती करण्यासाठी स्वच्छता अभियान संपल्यानंतर उपस्थितांना पथनाट्य किंवा तज्ञ व्यक्तींच्या मार्फतीने व्यसनमुक्ती सायबर सुरक्षा महीला सुरक्षा वाहतुक नियमन यासारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन करून जनजागृती केली आहे…
पोलिस अमलदारांची नेहमी काळजी करताना आयपीएस अधिकारी.! आयपीएस सत्यसाई कार्तिक यांचा एक स्वभाव आहे. सर्वांना सोबत घेऊन कोणताही भेदभाव न करता आपले कर्तव्य पार पाडणे व आपल्या पोलिस अमलदारांची काळजी नेहमी घेतात लोणावळा येथे पोलिसांसाठी आरोग्य शिबीर मोठ्या प्रमाणात राबवले …

दि.10/12/2022 रोजी कामशेत पोलिस स्टेशन येथे पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्या करीता नेत्र शिबीर आयोजीत करून अमंलदार यांची नेत्र तपासणी करण्यात आली.
दि.10/1/2023 रोजी लोणावळा शहर पो.स्टे.हद्दीत स्पार्क लाईफ केअर घाटकोपर मुंबई यांच्या वतीने एव्हिएन हॉटेल येथे पोलिस अधिकारी / कर्मचारी यांच्या कुंटंबाची सर्व आजारांची तपासणी करून तसेच सर्व रक्ताच्या तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले
दि. 11/1/2023 रोजी लोणवळा ग्रामीण पोलिस स्टेशन येथे स्पार्क लाईफ केअर घाटकोपर मुंबई यांचे वतीने पोलिस अधिकारी / कर्मचारी यांचे कुंटंबाची सर्व आजारांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करणेत आले.
दि.13/1/2023 रोजी वडगाव मावळ पोलिस स्टेशन हद्दीत विघ्नहर्ता हॉस्पीटल वडगाव मावळ यांच्या सौजन्याने लोणावळा विभागातील पोलिस अधिकारी व अमंलदार यांचेकरीता आरोग्य शिबीर आयोजीत करून श्वसनाचे आजार उच्च रक्तदाब मधुमेह आदी आजारांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले…
सोलापूर ग्रामीण प्रमाणे लोणावळ्यात देखील धडाकेबाज कामगिरी.क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करण्यात सत्यसाई कार्तिक हे नेहमी अग्रेसर राहीले आहेत कोणताही लूक आऊट न ठेवता तपास करत असल्याने गुन्ह्यांची उकल होण्यास मदत मिळते आहे..

लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन गुरनं.145/23 भादविक 302,201 मधील मौजे धामणधरा ता. मावळ जि.पुणे येथील स्मशानभुमीच्या जवळील पवना धरणाच्या जवळ ओढयाचे लगत यास कोणत्यातरी हत्याराने डोक्यात चेह-यावर पाठीत व पायांवर जबर मारहाण करून त्याची बॉडी धामणधरा ओढयाचे लगत टाकुन पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने त्याच्या अंगावरील कपडे काडुन त्यास नग्न करून त्याची बॉडी धामणधरा ओढ्याच्या लगत टाकुन दिली होती. सदर गुन्हा 24 तासांच्या आत उघडकीस आणुन आरोपी नामे विकास मारूती कोळी वय 22 वर्षे गणपत किसन कोळी वय 25 वर्षे दोन्ही रा.धामनदरा कातकरी वस्ती पो. पवनानगर ता. मावळ जि.पुणे यास अटक करण्यात आली होती.

वडगाव मावळ गुरनं. 93/ 23 भादविक प्रस्तुत गुन्ह्यातील मयत हा परवागी राहणारा असल्याने त्याची ओळख पटविणे अत्यंत अवघड होते परंतु तपास पथकाने कसोशीने प्रयत्नांची पराकाष्ठा करून मयतांची ओळख पटवुन अवघ्या 02 तासाच्या आत आरोपी निष्पन्न करून आरोपीला अटक करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणला..

कामशेत पो.स्टे. हद्दीत दरोडा, जबरी चोरी सारखे वारंवार तशा घटना घडत असलेने पोनि रविंद्र पाटील कामशेत पो.स्टे यांना सदर ठिकाणी सापळा रचनेबाबत आराखडा देवुन या अगोदर घडलेल्या गुन्हयांची वेळ याचा अभ्यास करून रचलेल्या सापळयामध्ये सदर ठिकाणावरून कामशेत गुरनं. 193/223 भादविक.392, 363 ,341, ,504 ,506 यामध्ये दोन आरोपी अटक करून त्यांच्या कडुन सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

लोणावळा उपविभागात अवैध कारवाईचा धडाका..
ऑर्केस्ट्रा बारवर छापा
कामशेत पोलिस स्टेशन हद्दीतील दिपा बार रेस्टारंट व वडगाव मावळ हद्दीतील फलेवर्स येथिल ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकुन 4 इसमाविरूध्द कारवाई करण्यात आली आहे.
जुगार कारवाई
उपविभाागातील पोलिस स्टेशन हद्दीत 32 गुन्हे दाखल करून 174 इसमाविरूध्द कारवाई करण्यात आली असुन 47,32,250/-रू चा माल जप्त केला आहे..
गुटखा कारवाई
लोणावळा उपविभागातील पोलिस स्टेशन हद्दीत गुटखा विकी करणा-या 27 इसमांवर कारवाई करून 23,59,522 /- रूचा माल जप्त करण्यात आला आहे. तसेच लोणावळा शहरात गुटखा विक्री करणा-या तब्बल 14 पान टपरी धारकांवर कारवाई करून यामध्ये 1लाख 82 हजार 772 रू चा माल जप्त करण्यात आला आहे.

अवैधरित्या दारूची विक्री
अवैधरित्या दारूची विक्री करणारे 78 इसमाविरूध्द 71 गुन्हे दाखल करून 30,65365 /-रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. लायन्स पॉईन्ट येथे मध्यरात्री उशीरा हुक्का ब्रिकी
करणा-या 4 इसमावर कारवाई करण्यात आली असुन 14 हजार 650 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एनडीपीस आर्म अॅक्ट कारवाई
लोणावळा उपविभागातील पोलिस स्टेशन हद्दीत सेवन करणे व विक्री करणा-या 57 इसमांविरूध्द 50 गुन्हे दाखल करून 27,0200/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.तसेच लोणावळा आणि कामशेत या दोन ठिकाणाहुन 8 इसमांविरूध्द गुन्हे दाखल करून 38,-लाखांच्या एम डी पावडरसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..
वाहतुक शिस्त
आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी पदभार घेतल्यापासून वाहतूक शिस्त लागली व वाहतूक कोंडी कमी झाली आहे.योग्य नियोजन व सगळीकडे लक्ष असणारे अधिकारी म्हणून नावलौकीक मिळवला आहे
पावसाळी सिझन वर्षाविहाराच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात भाविक येतात. सदर कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी होते परंतु सदर परीसराची पाहणी करून बंदोबस्ताचे नियोंजन वाहतुकीचे नियोंजन करून तसेच इच्छुक स्वयंसेवक नेमुन त्यांच्या मदतीने योग्यरीतीने वाहतुकीचे नियांजन करण्यात आले होते कोणत्याही परीसरात वाहतुकीची कोडी निर्माण होवुन दिली नाही लोणावळा हे पुणे व मुंबई या दोन महानगराचे दरम्यानचे जगप्रसिध्द पर्यटनस्थळ असून लोणावळा परिसरातील पो एकविरा स्टे हद्दीतील श्री. देवी मंदीर, वेहेरगाव, कार्ला लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, पवना धरण परिसर, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट व पोहद्दीतील इतर पर्यटन स्थळी. स्टे. जुन ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात देश विदेशातून पर्यटक भेट देत असतात …

खाकीतल्या जिगरबाज धाडसी दबंग अधिकाऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…

सत्यसाई कार्तीक यांची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत दणकेबाज कारवाई…

आयपीएस सत्यसाई कार्तीक यांची अमलीपदार्थ विकणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई…

सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची मटका अड्ड्यावर धडक कारवाई…

आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची ऑर्केस्ट्रा बारवर धडक कारवाई…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

policekaka-special-offer

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!