सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…
गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात लोणावळा विभागात सत्यसाई कार्तिक यांची सहायक पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती होताच क्षणार्थात लोणावळा विभागाची कामगिरी उजळली आहे. अल्पावधीत काळात कार्तिक यांनी गुन्हेगारी जगताची पाळेमुळे नष्ट करायला सुरुवात केली आहे. गुन्हेगार व बेकायदेशीर धंदे करणारे लोक अक्षरश: त्यांचे नाव घेताच थरकापाने उडत आहेत.
अल्प परिचय…
क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी
तरूण तडफदार आयपीएस अधिकारी म्हणून सत्यसाई कार्तिक ओळखले जातात. आपल्या प्रोबेशन काळात सोलापूर ग्रामीण पोलिस दलात त्यांनी आपली वेगळी छाप पाडली होती. सत्यसाई कार्तिक यांचा जन्म तेलंगणा, हैदराबाद येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षणही हैदराबादमध्ये पूर्ण झाले आणि त्यानंतर त्यांनी तेथील स्थानिक महाविद्यालयातून संगणक अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. क्रिकेट खेळाची आवड असलेले कार्तिक यांनी रणजी स्पर्धेत अंडर-19 संघात आपल्या राज्यासाठी क्रिकेट खेळले असून आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व देखील केले आहे.
बेधडक निडरपणे कारवाई…
गुन्हेगारांचे कर्दनकाळ, कर्तबगार ,स्वच्छ प्रतिमेचे पोलिस अधिकारी त्यांच्या कर्तव्याबद्दल बोलायचे झाल्यास, पोलिसांचे ब्रीदवाक्य असलेले ‘सदरक्षणाय खलनिग्रणाय’या शब्दाला अनुसरून आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत. सोलापूर ग्रामीण नंतर लोणावळा येथे आपली नियुक्ती सार्थ ठरवताना सर्वसामान्यांना न्याय मिळाल्याचे चित्र लोणावळा विभागात दिसत आहे, याचमुळे कार्तिक हे सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप लावत असताना गुन्हेगारीवर चांगलेच नियंत्रण मिळवले. शांत, संयमी मात्र तेवढेच कार्यतत्पर अधिकारी म्हणून ते सध्या उदयास येत आहेत. रेव्ह पार्ट्या, हुक्का पार्टी, अवैध गुटखा, अवैध दारू, गांजा मटका, प्रकरणांमध्ये कार्तिक यांनी केलेली कारवाई चांगली गाजत आहे. बेकायदेशीर धंदे पर्दाफाश करत असल्याने कार्तिक यांनी केलेल्या कामगिरीमुळे जनसामान्यांत त्यांची गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी ओळख झाली आहे. अनेक गुन्हेगारांवर पोलिस गिरीचा वचक बसवून आपल्या कामगिरीने जरब बसवली. त्यांनी चुकीच्या माणसाचे कधीच समर्थन केले नाही व गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहेत. कायद्यात रहाल तर फायद्यात राहाल असा संदेश जात आहे हे नक्की .
सत्यसाई कार्तिक यांच्या तत्परतेमुळे लोणावळा विभागास अच्छे दिन…
खाकी वर्दी म्हटली, की अनेकांची बोबडी वळत असते, वास्तविक गुन्हेगारांसाठी ती भीतीदायक असावी, जो निरपराध आहे, त्याने या वर्दीला घाबरण्याचे काहीच कारण नाही, असे खुद्द कार्तिक साहेब सांगताना नेहमी दिसतात. लोणावळा विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर बेकायदेशीर धंदे बंद होण्यासाठी सत्यसाई कार्तिकी यांनी आपले प्रयत्न सुरू केले आहेत .
प्रशंसनीय कामगिरी
– लोणावळा येथे अश्लील गाण्यावर विवस्त्र चाळे करुन अश्लील नृत्य करणाऱ्या 53 जणांवर लोणावळा पोलिसांची कारवाई; 44 पुरुष व १ महिलांचा समावेश
– वडगाव मावळ येथे फोफावलेल्या अवैध जुगार अड्डयावर IPS सत्यसाई कार्तिक यांचा छापा ,१६ लाख ८४ हजारांच्या मुद्देमालासह १० जण ताब्यात; सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक व वडगाव मावळ पोलिसांची संयुक्त कामगिरी.
– मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर लुटमार करणारे ४ जण अटकेत.
– कुरवंडे येथे बंगल्यात रात्री उशिरापर्यंत साऊंड सिस्टिम लावत बारबालांसह नाचणे भोवले; लोणावळ्यात 10 जणांवर गुन्हा दाखल.
– कर्नाटकातून मुंबईकडे निघालेल्या ट्रकमधून साडेदहा लाखांचा गुटखा जप्त हायवेवर सापळा रचून कारवाई..
– सत्यसाई कार्तीक यांची वेहेरगाव येथील मटक्यावर धडाकेबाज कारवाई.एकुण १७ लाख २९ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.
– साते येथील जुगार आड्यावर छापा; तीन जण ताब्यात तर तीन जण फरार.
– वडगाव मावळ पोलिस स्टेशन हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस दोन तासात अटक करण्यासाठी आयपीएस कार्तिक सरांनी मार्गदर्शन केले होते.
– कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर पोलिसांकडून चोरीचे पाच गुन्हे उघड तर सात जणांना अटक.
सोलापूर ग्रामीण पोलिस दलात धडाकेबाज कामगिरी…
सोलापूर ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असताना सत्यसाई कार्तिक (भापोसे) परिविक्षाधिन पोलिस अधिक्षक यांनी सोलापूर तालुका पोलिस ठाणे येथे दिनांक ०४.०४.२०२२ ते २९.०६.२०२२ पर्यत स्वतंत्र प्रभारी अधिकारी म्हणून नेमणुक करण्यात आली होती. सदर कालावधी मधे सत्य साई कार्तिक यांनी खालील नमूद प्रमाणे कामकाज/कार्यवाही केली.
सत्य साई कार्तिक, परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक, सोलापूर तालुका, पोलिस ठाणे यांनी स्वतंत्र प्रभारी अधिकारी म्हणुन केलेल्या कामकाजा बाबत सवीस्तर माहिती. अवैध व्यवसाय करणारे यांचे विरुध्द केलेली कारवाई
पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी राबविलेल्या “ऑपरेशन परिवर्तन” या मोहीम अंतर्गत
पोलिस ठाणे कडील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांच्याकडून मुळेगाव तांडा, भानुदास तांडा, वडजीतांडा, गुळवंचीतांडा, कोंडीतांडा, सितारामतांडा व सेवालाल नगर या परिसरात चोरून चालणा-या अवैध हातभट्टी व्यवसाय करणारे एकूण ९५ इसमा विरुध्द २६ लाख ७८ हजार ५२० रुपये किंमतीचे १ लाख ४ हजार ३० लिटर गुळमिश्रीत रसायन नष्ट केले आहे. अवैध जुगार खेळणारे एकूण ४६ इसमा विरुध्द कारवाई करून त्यांचेकडुन एकूण ८ लाख २९ हजार ६२० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
– अवैध वाळू उपसा करणा-या विरुध्द एकूण ८ गुन्हे दाखल करून त्यामध्ये ७४ लाख ७२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
– अवैधरित्या गॅसची विक्री करणारे याचे विरुध्द ५ गुन्हे दाखल करून ६ लाख ९६ हजार ८३० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
– अवैधरित्या तांदुळाची वाहतुक करणारे १ इसमा विरुध्द कारवाई ३२ लाख २५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
– नान्नज येथील विजयराज ऑकेस्ट्रा बारवर छापा टाकुन १८ इसमा विरुध्द कारवाई करण्यात आली
अवैधरित्या दारूची विक्री करणारे १२ इसमा विरुध्द १२ गुन्हे दाखल करून ५३ हजार ४७५ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
मौजे वडाळा येथे दिपक उर्फ दादा शिवाजी कोळेकर यास वडाळा येथील राहणारे सविता उर्फ जयश्री उर्फ बाई भोसले हिने डोक्यात लोखंडी पाईपने मारून त्यास ठार केले होते. त्या गुन्हयातील आरोपीस अटक करून गुन्हयाचा तपास पूर्ण केला आहे.
दिनांक ०४.०६.२०१२ रोजी रात्रौ २३.१५ ते २३.४५ वा. सुमारास मारुती दत्तु शिंदे, वय ३६ व्यवसाय शेती रा. डोंबाळे वस्तीच्या जवळ उळेगाव ता. दक्षिण सोलापूर याचे वस्तीवर त्याचे ओळखीच्या एक व त्याचे सोबत आलेल्या ४ लोकांनी मारुती शिंदे, त्याची पत्नी व मावशी यांना तलवार व चाकुचा धाक दाखवून त्याचेकडे सोन्याचे दागिने, मोबाईल हॅन्डसेट व रोख रक्कम असा एकूण १०६,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला होता. सदर बाबत पोलिस ठाणे येथे दरोडयाचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयातील निष्पन्न व अनोळखी ४ इसमाचा गुन्हे प्रकटीकरणातील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार याचेकरवी शोध घेऊन ४ आरोपी व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना निष्पन्न केले आहे. ३ आरोपी यांना अटक करून त्यांचे कडुन गुन्हयात वापरलेले तलवार, चाकु, चाबुक व पक्कड सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १०६२५० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारे दोन कंटेनर पकडुन त्यामध्ये एकूण १ कोटी ७४ हजार रुपये किंमतीचा गुटखा व ४५ लाख रुपये किंमतीचे दोन कंटेनर असा एकूण १ कोटी ४५ लाख ७४ हजार रूपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. सदर गुन्हयाचा तपास आम्ही स्वतः करून गुन्हयात आजपावेतो एकूण ५ आरोपी यांना अटक करून त्याचेकडे तपास करण्यात आलेली आहे.