पुणे पोलिस आयुक्तांकडून एम.पी.डी.ए. कायद्यान्वये २६वी कारवाई…

पुणेः विमानतळ पोलिस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एम.पी.डी.ए. कायद्यान्वये २६ वी स्थानबध्दतेची कारवाई केली आहे.

पुणे पोलिस आयुक्तालयातील विमानतळ पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार ऋतिक गौतम अवधूत (वय १९, रा. संजयपार्क झोपडपट्टी, न्यु एअरपोर्ट रोड,विमाननगर, पुणे) हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत लोखंडी रॉड, धारदार हत्यार, या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, दंगा,बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ५
वर्षामध्ये त्याचेविरूध्द ४ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.

प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी त्याच्याविरुध्द एम. पी. डी. ए. कायद्यान्वये अमरावती मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. आरोपीस स्थानबध्द करण्यामध्ये विमानतळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक,पी.सी.बी. गुन्हे शाखेच्या वैशाली चांदगुडे यांनी कामगिरी पार पाडली.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दहशत निर्माण करणा-या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. पोलिस आयुक्त यांनी कार्यभार स्विकारल्यानंतरची एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची ही २६ वी कारवाई असून, यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!