बिबवेवाडी पोलिसांनी दुकानात चोरी करणाऱ्या आरोपीस केले जेरबंद….

पुणे (संदीप कद्रे): बिबवेवाडी पोलिसांनी दुकानाचा दरवाजा तोडून चोरी करणाऱ्या आरोपीस जेरबंद केले आहे. आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरी केलेली रक्कम 3,82,000 रुपये व गुन्हा करण्यासाठी वापरलेला फ्लाय कटर हा जप्त केला आहे. सहा. पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे यांनी तपास उघड केला असून, पुढील तपास करत आहेत.

विलास तुकाराम आधवडे (वय ४९ वर्षे, धंदा व्यवसाय रा.एच ८०१, द लिफ सोसायटी पानसरे नगर येवलेवाडी पुणे) यांनी तक्रार दाखल केली होती. बालाजी मार्केट अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी पुणे येथील फिर्यादी यांचे अनुराग इंजिनिअरींग हे दुकान कुलूप लावून बंद केले होते. चोरट्याने दुकाना मागील दरवाजा कापून दुकानामध्ये प्रवेश करून दुकानातील गोदरेजचे लोखंडी कपाटाचे ड्राव्ह कापून त्यामधील रोख रक्कम चोरून नेली होती.

बिबवेवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं.274/2023 भा.द.वी कलम 454,457,380 या गुन्ह्याचा तपास करीत असताना मिळालेल्या माहितीवरून समीर हाकीकुल्लाह खान (वय 29 रा. अप्पर बिबेवाडी पुणे) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे दाखल गुन्हयाबाबत तपास करता दाखल गुन्हा त्याने केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून दाखल गुन्ह्यातील चोरीस गेली रक्कम 3,82,000 रुपये व गुन्हा करण्यासाठी वापरलेला फ्लाय कटर हा जप्त करण्यात आलेला आहे, अशी माहिती बिबेवाडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक ढमढेरे यांनी दिली.

बिबवेवाडी पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्यास २४ तासाच्या आत केली अटक…

पुणे शहरात कंपनीत एचआर पदावर काम करणाऱ्या युवतीवर बलात्कार…

गँगस्टर शरद मोहोळ याचा CCTVसमोरच का केला खून…

पुणे शहरात भाजप आमदाराची अजित पवार यांच्यासमोरच पोलिसाला मारहाण…

पुणे शहरात पोलिसांसमोरच कोयता गँगने युवकांवर केला हल्ला…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!