
Video: पुणे शहरात आगीचे रौद्र रूप, ६० वाहने जळून खाक…
पुणे : पुणे शहरातील येरवडा परिसरात आज (सोमवार) दुपारी लागलेल्या भीषण आगीत ६० वाहने जळून खाक झाली आहेत. भूमी अभिलेख कार्यालयाजवळील एका मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या 40 दुचाकी आणि 20 चारचाकी वाहने जळाल्याची माहिती पुढे आली आहे. दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
येरवडा परिसरातील या मोकळ्या जागेत पोलिसांनी जप्त केलेली तसेच पार्किंगसाठी ठेवलेली मोठ्या प्रमाणावर वाहने उभी करण्यात आली होती. अचानकपणे या ठिकाणी आग लागल्याने काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले. एकामागोमाग एक वाहनांना आग लागत गेल्याने संपूर्ण परिसरात धुराचे दाट लोट पसरले होते. आगीची तीव्रता इतकी होती की काही अंतरावरूनही धुराचे लोट स्पष्टपणे दिसत होते. आगीची माहिती मिळताच येरवडा अग्निशमन केंद्रासह पुणे महापालिकेच्या विविध अग्निशमन दलांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तत्काळ पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आली. मात्र तोपर्यंत बहुतांश वाहने पूर्णपणे जळून खाक झाली होती.

दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक माहितीतून स्पष्ट झाले असले तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जळून गेलेल्या वाहनांमध्ये काही महागड्या चारचाकी गाड्यांचाही समावेश असल्याने नुकसान लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किट, ज्वलनशील पदार्थ किंवा इतर कोणत्याही कारणामुळे ही आग लागली असावी का, याबाबत तपास सुरू आहे. पोलिस आणि अग्निशमन विभागाकडून घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करण्यात येत असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारेही तपास केला जात आहे.
येरवडा येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या मोकळ्या आवारात दुपारी साडेबारा वाजता दुचाकी व चारचाकी वाहनांना आग लागल्याची घटना घडली. सुमारे ५० पेक्षा अधिक वाहनांना आग लागली असताना पुणे अग्निशमन दलच्या चार बंब वेळेत दाखल झाल्या. pic.twitter.com/Qm1oTzrKe7
— PMC Care (@pmccarepune) February 23, 2026
पुणे! एका १४ मजली इमारतीला लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू…
पुणे शहरात मध्यरात्री भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू…
पुणे जिल्ह्यातील जगदंबा हॉटेलमध्ये भीषण स्फोट; 10 कर्मचारी भाजले…
पुणे! विवाहित प्रेयसीला गावी फिरायला जाऊ म्हणून कारमध्ये बसवले अन्…

