
Hit and Run! पिंपरी-चिंचवडमध्ये कारने पादचारी महिलेला उडवलं…
पुणे: पिंपरी-चिंचवड परिसरात हिट अँड रनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कार चालकाकडून रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या महिलेच्या अंगावर घातल्यानंतर कारचालक पसार झाला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये हिट ऍण्ड रनचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सुदैवाने यात महिला थोडक्यात बचावली आहे, मात्र त्या जखमी झाल्या आहे. पिंपरी गावात रस्त्याच्या बाजूने चाललेल्या महिलेला कारने समोरून येत ठोकरले. त्यानंतर कार चालक पसार झाला. प्रत्यक्षदर्शींनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र तो हाती लागला नाही. पिंपरी पोलीस त्या चालकाचा शोध घेत आहेत.
कारने महिलेला दिलेली धडक इतकी जोराची होती की यात रस्त्यावरुन चालत असलेली महिला गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या अखत्यारीत असणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांचं नेमकं चाललंय तरी काय? चौंबे यांचा पोलिसांवर वचक राहिला नाही का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हिट ऍण्ड रन! ओळख लपवण्यासाठी गाडीतच कापले केस आणि केली दाढी…
हिट ॲण्ड रन! पुणे शहरात कारने पोलिकाकाला चिरडले…
वरळी हिट अॅण्ड रन प्रकरण! दोन किमी फरफटत नेले अन् घेतला महिलेचा जीव…
नशिब बलवत्तर! पिंपरी-चिंचवडमध्ये अपघाताचा धक्कादायक Video समोर…
पिंपरी-चिंचवडमध्ये मैत्रिणीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या अंगावर घातली कार…
पोलिसकाकाचा नाईट ड्युटीवरुन घरी जाताना भीषण अपघातात मृत्यू…

