नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्याची निर्घृण हत्या; आरोपींचा अपघात अन् पुढे…

नागपूर : उमरेड तालुक्यातील सुरगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि भाजप उमरेडचे तालुका महामंत्री राजू भाऊराव ढेंगरे (४८, रा. दिघोरी, नागपूर) यांची शुक्रवारी (ता. १०) मध्यरात्री निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नागपूर-उमरेड महामार्गावर कुही फाट्यालगत त्यांचा ढाबा आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर २:३० वाजताच्या सुमारास राजू ढेंगरे गाढ झोपेत असतानाच ढाब्यावर काम करणाऱ्या दोन नोकरांनी त्यांचा गळा आवळून डोक्यावर काठीने हल्ला केला. महिनाभरापूर्वी त्यांनी ढाब्यावर मंडला आणि आदी नावाचे दोन नोकर कामाला ठेवले होते. दोन्ही नोकरांना दिवाळीच्या सणानिमित्त गावाला जायचे होते. त्यांनी राजू ढेंगरे यांना मजुरी मागितली. यावरून भांडण झाल्याची माहिती पुढे आली आहे.

सुरगाव ग्रामपंचायत निवडणुकीत नुकतेच ते सदस्य म्हणून विजयी ठरले होते. शुक्रवारी उशीर झाल्याने ते ढाब्यावर असलेल्या खाटेवरच झोपी गेले. गाढ झोपेत असताना आरोपींनी कापडाने गळा आवळला. काठीने वार केले. यामध्ये राजू ढेंगरे गंभीर जखमी झाल्यामुळे जागीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी पसार झाले. या संपूर्ण घटनेवेळी अन्य एक पांडू नावाचा नोकर घटनास्थळी होता. कुही पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध ३०२ (३४) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस यंत्रणा करीत आहे.

राजू ढेंगरे यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा व्यक्त होत आहे. आरोपींना अटक करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, राजू ढेंगरे यांची हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपींनी राजू ढेंगरे यांचे चारचाकी वाहन पळविले. ढाब्यावरच त्यांची एमएच ४० एसी ७७०७ ही अल्टो गाडी उभी होती. आरोपींनी वाहनाची चावी घेत चारचाकीने पळ काढला. आरोपींनी चारचाकी वाहन पळविल्यानंतर काही अंतरावर वाहनाचा अपघात झाला. विहीरगाव पुलालगत असताना अल्टो कार पलटली. अपघातानंतर काहींनी धाव घेत दोघांनाही सहीसलामत बाहेर काढले. अशातच काही अंतरावर पुन्हा एका वाहनाचा अपघात झाला. लोकांनी दुसऱ्या अपघात स्थळाकडे धाव घेतली. तर इकडे या दोन्ही आरोपींनी अपघात स्थळावरून पळ काढला.

हृदयद्रावक! गरोदर महिलेची आत्महत्या; पोटातील बाळही दगावले…

स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या पत्नीची संशयावरून हत्या…

नांदेड हादरले! टोळक्याकडून युवकाची तलवारीने सपासप वार करत हत्या…

पुणे हादरलं! क्षुल्लक कारणावरुन टोळक्याने केली युवकाची हत्या…

हिंजवडी येथील कंपनीमध्ये काम करणाऱ्या युवकाची आत्महत्या…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!