कोंढवा पोलिसांनी गंभीर गुन्हयातील फरारी आरोपींना केले जेरबंद…

पुणे (संदीप कद्रे): मोक्का सारख्या गंभीर गुन्हयात फरारी असलेल्या दोन आरोपींना सिने स्टाईल पाठलाग करुन जेरबंद करण्यात कोंढवा पोलिसांना यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

कोंढवा पोलिस ठाणे पुणे शहर गुरन. ८९६ / २०२३ भादवि कलम ३०२,३६३,३२६, १४३, १४७,१४८,१४९, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (२). ३ (४) प्रमाणे गुन्हा दाखल आहेत. सदर गुन्हयात यापुर्वी अटक आरोपी व पाहिजे आरोपी यांनी दोन मुलाचे वर्चस्वाच्या वादातून अपहरण करुन त्यांना डांबुन ठेवुन त्याच्या पैकी एकाला जबर मारहाण करुन खुन केला होता. तसेच दुसऱ्या मुलाला गंभीर जखमी करुन रोडवर फेकुन दिले होते. त्याबाबत वरिप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्हयात आरोपी राजेंद्र उर्फ राजु ठोबरे व आमिन उर्फ घान्या कांरजे हे गुन्हा केल्यापासून फरारी होते.

सदर आरोपी याचा तपास पथकातील अधिकारी लेखाजी शिंदे, सहा. पोलिस निरीक्षक, दिनेश पाटील, सहा. पोलिस निरीक्षक, पोलिस अंमलदार पो हवा. २८३ अमोल हिरवे, पो हवा राहुल वंजारी, पो. शि. ८२९८ अभिजीत रत्नपारखी पो. शि. १०११४ सुहास मोरे, पो.शि.९१२६ विकास मरगळे, पो. शि.८६४६ जयदेव भोसले, पो. शि. १००२६ राहुल थोरात, पो. शि. शंशाक खाडे, पो शि आशिष गरुड, पो शि रोहित पाटील, असे गुप्त बातमीदाराच्या मदतीने शोध घेत होतो. आरोपींपैकी आरोपी राजेंद्र उर्फ राजु ठोबरे (वय २१ वर्षे, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खु. पुणे) हा आशिर्वाद चौकात वेश बदलून ०२/११/२०२३ रोजी सकाळी ०८.०० वा सुमारास येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार राहुल थोरात, जयदेव भोसले, विकास मरगळे यांना त्याच्या खास बातमीदाराकडून प्राप्त झाली होती.

सदर माहितीच्या अनुषंगाने आशिर्वाद चौकात थांबला असता आरोपी राजेंद्र उर्फ राजू ठोबरे हा तोडावर माकड टोपी व अंगात जर्किग घालुन आशिर्वाद चौकात याठिकाणी आला असताना त्याला पोलिसांची चाहुल लागल्याने तो पळून जावू लागला त्याचा सिने स्टाईल पाठलाग करुन त्यास ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे. आरोपी हा आमिन उर्फ घान्या हुसेन कांरजे (वय २२ वर्षे, रा. लक्ष्मीनगर, ग.न. ०२, कोंढवा बुगा पुणे) हा चंदनगर याठिकाणी लपून राहत असून तो ०३/११/२०२३ रोजी खडी मशीन चौक याठिकाणी ओळख लपवून तोडावर मास्क व टोपी घालुन येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार शंशाक खाडे, अमोल हिरवे, सुहास मोरे यांना त्याच्या खास बातमीदाराकडुन प्राप्त झाली होती. सदर माहितीच्या अनुषंगाने त्यास खडी मशीन याठिकाणी ०३/११/२०२३ रोजी पकडण्यासाठी गेले असताना त्याला पोलिसांची चाहुल लागल्याने तो रस्त्याने जाणा-या टेम्पोला लटकून पळून जावु लागला होता. पोलिसांनी त्याचा सिने स्टाईल पाठलाग करुन त्यास ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे. नमुद दाखल गुन्हयाचा पुढील तपास शाहुराव साळवे, सहा. पोलिस आयुक्त हे करीत आहेत.

संबंधित कामगिरी ही पोलिस आयुक्त रितेशकुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, रंजन शर्मा, अपर पोलिस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग, विक्रांत देखमुख, पोलिस उप आयुक्त परि. ०५, शाहुराव साळवे, सहा. पोलिस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, संदिप भोसले, पोलिस निरीक्षक (गुन्हे) व संजय मोगले पोलिस निरीक्षक (गुन्हे), यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे करण्यात आली आहे.

पुणे शहरात युवकाला नग्न करुन लावलं नाचायला अन् पुढे…

Video: पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर…

पुणे शहरात थरार! सराफा व्यावसायिकावर गोळीबार अन् दागिने लुटले…

पुणे शहरात मैत्रिणीला भेटण्यासाठी घातला बुरखा अन् पुढे…

पुणे हादरलं! क्षुल्लक कारणावरुन टोळक्याने केली युवकाची हत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!