पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याबरोबरच बॉम्ब स्फोटची धमकी…
पुणे: एका अज्ञात व्यक्तीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
भारतात विविध ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट घडवून आणण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. पुण्यातील एका व्यक्तीला विदेशातून एक ईमेल आला. त्यामध्ये मी भारतामध्ये सिरीयल बॉम्ब ब्लास्ट करण्याचा प्लॅन करत आहे, मी हिंदू धर्म आणि हिंदू धर्मातील महिलांना नष्ट करेन, अशा आशयाचा मेल करत अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आली आहे. “आय विल किल नरेंद्र मोदी अल्सो”, असा उल्लेखही मेलद्वारे करण्यात आला आहे.
विदेशातून ईमेल करत एका व्यक्तीने ही धमकी दिली. एम. ए. मोखीम असे धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव आहे. मी अनेक दहशतवादी संघटनांना फंडिंग करतो. हिंदू महिला आणि हिंदूंना देशातून नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. देशात अनेक ठिकाणी मृत्यू घडवून आणण्याची धमकीसुद्धा आरोपी मोखीम या नावाने ईमेल वापरणाऱ्या व्यक्तीने दिली आहे. ज्या व्यक्तीला हा मेसेज आला होता. त्यांनी पुणे शहर पोलीस दलाच्या कंट्रोल रूमला माहिती देऊन पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पुण्यातील दहशतवाद प्रकरण आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) कडे सोपवण्यात आले आहे. ATS कडून पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांचा तपास आता एनआयए कडे वर्ग करण्यात आला आहे. मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युनूस साकी हे दोघे ही दहशतवादी एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड यादीत सक्रिय होते. पुणे शहरातून त्यांना अटक करण्यात आली आहे. एनआयए आणि एटीएसने अटक केलेले दहशतवादी एकमेकांच्या संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून दहशतवादी कारवाईची धमकी…
मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन…
छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणारा म्हणाला…
पुणे दहशतवादी अटक प्रकरणात मोठी घडामोड; वाहनात आढळला शस्त्रसाठा…
पुणे दहशतवादी प्रकरण : भूलतज्ञ डॉक्टर युवकांना ओढायचा ISISच्या जाळ्यात अन्…
दहशतवाद्यांच्या घरात सापडली बॉम्ब बनविण्याबाबतची चिठ्ठी…
पुण्यात स्फोट करण्याचा कट; तिसऱ्या आरोपीला गोंदियातून अटक…
पुण्यातील संशयित दहशवादी प्रकरणात आणखी एक ताब्यात; युवती रडारवर…