पुणे जिल्ह्यातील नसरापूर प्रकरणात धक्कादायक माहिती कोर्टासमोर…

पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील अत्याचार आणि खून खटल्याची सुनावणी सुरू असून, आरोपी कांबळेवर फक्त 28 दिवसात आरोप निश्चित झाले होते. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयासमोर गुरुवारी या प्रकरणाची अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडली.

सुनावणीच्या वेळी ससून रुग्णालयात पीडित मुलीचे शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली. डॉक्टरांनी आपल्या साक्षी दरम्यान कोर्टासमोर अत्यंत धक्कादायक आणि महत्त्वपूर्ण माहिती दिली. पीडित मुलीचा मृत्यू होण्यापूर्वी तिच्यावर अत्यंत क्रूरपणे लैंगिक अत्याचार झाल्याचं डॉक्टरांनी आपल्या माहितीत स्पष्ट केले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची ही साक्ष आरोपीला कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने या खटल्यातील सर्वात मोठा आणि कायदेशीर रित्या भक्कम पुरावा मानला जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

न्यायालयीन प्रक्रियेचा भाग म्हणून सरकारी पक्षातर्फे न्यायालयात एकूण 82 साक्षीदारांची विस्तृत यादी सादर करण्यात आली आहे. या सर्व साक्षीदारांच्या माध्यमातून घटनेची साखळी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. गुरुवारच्या सुनावणी दरम्यान एकूण 7 वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष कोर्टासमोर नोंदवण्यात आली. या प्रकरणात दररोज सुनावणी होत आहे. आतापर्यंत या संपूर्ण खटल्यात एकूण 30 महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवून पूर्ण झाली आहे.

दरम्यान, कोर्टात साक्ष दिलेल्यांच्या यादीत पीडित मुलीचे कुटुंबीय, घटनेनंतर मुलीचा शोध घेणारे स्थानिक शोध पथक, परिसरातील CCTV फुटेजशी संबंधित तांत्रिक साक्षीदार, पंच, ससून रुग्णालयातील इतर वैद्यकीय अधिकारी आणि काही बाल-साक्षीदारांचा प्रामुख्याने समावेश आहे.

पुणे! नसरापूर प्रकरणातला सगळ्यात मोठा पुरावा सीसीटीव्हीत कैद…

नसरापूर प्रकरण! CCTV फुटेजमुळे वाढलं गुढ; गाठोड्यात नेमकं काय…

पुणे! नसरापूरमधील मुलीचा शवविच्छेदन अहवाल समोर; आरोपीने काय केले पाहा…

नसरापूर! पोलीस मध्यरात्रीच्या अंधारात आरोपीला गुपचूप ‘त्या’ जागेवर घेऊन गेले अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!