पुणे शहरातील गुन्हेगारी संपवण्यासाठी पुणे पोलिसांचा पुढचा प्लॅन तयार…

पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरातील गुन्हेगारी संपविण्यासाठी पुणे पोलिस आता बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांची झाडाझडती घेणार आहे. या झाडाझडतीची तयारी पुणे पोलिसांनी सुरु केली आहे. विविध भागातील पोलीस ठाण्यातून माहिती मागवली जात आहे.

कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर तीन ते चार गोळीबाराच्या किरकोळ घटना घडल्या होत्या. त्यामुळे आता पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आले आहे. पुणे पोलीस आता बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांची झाडाझडती घेणार आहे.

मागील महिन्याभरात राज्यभरात गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता पिस्तूल धारकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. कोणाकडे बेकायदा पिस्तूल आहे? किती गुन्हे दाखल आहे? कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहे? पिस्तुलचा वापर नेमका कोणत्या शहरात आणि कशासाठी केला आहे? या सगळ्याची माहिती घेतली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे हे गुन्हेगार आता नेमकं काय करतात? याचीदेखील माहिती घेतली जाणार आहे.

पुणे शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढताना दिसत आहे. पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी चंग बांधला आहे. त्यातच पुण्यातील कुख्यात गुंड आणि गुन्हेगारांना बोलवून त्यांची परेड काढली. त्यानंतर ड्रग्स तस्करांना बोलवून त्यांना सज्जड दम दिला. कोणत्याही प्रकारचा गुन्हा करायचा विचार केला तर याद राखा, अशा शब्दांत त्यांना दम दिला. त्यानंतर सोशल मीडियावरुन गुन्हेगारी पसरवायची नाही, रिल्स पोस्ट करायचे नाही, अशा कडक शब्दांत सूचना दिल्या. त्यानंतर आता पिस्तूल धारकांवर पुणे पोलिसांनी नजर असणार आहे. या सगळ्या गुन्हेगारांची यादी तयार केली आहे.

पुणे शहरात सलग चौथ्या दिवशी खुनाची घटना; भरदिवसा महिलेची हत्या…

पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी खून; आईच्या हत्येनंतर मुलगा…

पुणे पोलिस आयुक्तपदाचा अमितेश कुमार यांनी स्विकारला पदभार…

शरद मोहोळ प्रकरणाशी संबंधित आरोपी ससून रुग्णालयातून पळाला…

पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांचा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना मोठा दणका…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!