समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कुटुंबावर काळाचा घाला…
वाशीम : समृद्धी महामार्गावरील अनेक वाहनांना झालेल्या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. महामार्गावरील अपघाताचे सत्र काही केल्या कमी होत नाही. मंगळवारी (ता. १९) संध्याकाळी गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला जाणाऱ्या कारचा वन्यप्राण्याला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहे. वाशिम जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी वनोजा कारंजा […]
अधिक वाचा...गणपती बाप्पांना घरात आणताना पाय घसरल्याने युवकाचा मृत्यू…
कोल्हापूर : गणपती बाप्पांना घरात आणताना पाय घसरुन पडल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आजरा तालुक्यातील बोलकेवाडी येथे घडली आहे. गणेश चतुर्थी दिवशी घडलेल्या या दु:खद घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. सचिन शिवाजी सुतार असे मृत्यू झालेल्या गणेशभक्ताचे नाव आहे. सचिन सुतार हे आज (मंगळवार) सकाळी गणपती घेऊन घरी आले. घरात गणपती घेताना चौकटीला […]
अधिक वाचा...सापावर पाय पडल्याच्या भीतीनंतर चिमुकल्याचा घाबरुन मृत्यू…
कोल्हापूर: शाळेतून घरी येत असताना सापावर पाय पडल्यामुळे चिमुकला घाबरून आजारी पडला होता. ताप मेंदूपर्यंत गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वाकरे (ता. करवीर) येथे रविवारी (ता. 17) सायंकाळी घडली आहे. अर्णव नवनाथ चौगुले (वय 8) असे त्या चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. इंग्रजी माध्यमात शिकत असलेला अर्णव चार […]
अधिक वाचा...दोन कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या माओवाद्यांच्या बड्या नेत्याला अटक…
मुंबई: दोन कोटी रुपयांचे बक्षीस जाहिर असलेल्या उच्चशिक्षित जहाल माओवादी नेत्याला तेलंगणामधून पोलिसांनी अटक केली आहे. संजय राव उर्फ दीपक असे या माओवाद्याचे नाव आहे. संजय याची पत्नीही माओवादी असून तिलाही बंगळूरूमधून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. संजय हा उच्चशिक्षित आहे. त्याने बीटेकपर्यंत शिक्षण घेतले आहे. तो गेल्या तीस वर्षांपासून माओवादी चळवळीत सक्रिय आहे. […]
अधिक वाचा...ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची मध्यरात्री हत्या; नदीवर अंघोळ केली अन्…
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्याची पतीने निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने पोलीस ठाण्यात जाऊन स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या सगळ्या प्रकारानंतर गडचिरोलीत खळबळ उडाली आहे. गडचिरोलीच्या कुरखेडा येथील शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेनेची शहर प्रमुख राहत सय्यद (वय 30) यांची त्यांचा पती ताहेमिम शेख […]
अधिक वाचा...जवानाने आठ महिन्यांच्या गरोदर पत्नीची आणि चिमुकलीची केली हत्या…
नांदेड: भारतीय लष्करात असलेल्या जवानाने गरोदर पत्नी आणि चार वर्षाच्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना कंधार तालुक्यातील बोरी येथे घडली आहे. हत्येनंतर आरोपी पती एकनाथ जायभाये हा स्वतः पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी एकनाथ जायभाये हा सैन्यदलात आहे. राजस्थान मधील […]
अधिक वाचा...महाराष्ट्राचा सुपुत्र आकाश अढागळे लेहमध्ये हुतात्मा…
वाशिम : महाराष्ट्राचा सुपुत्र आणि वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन गावचे जवान आकाश काकाराव अढागळे वीरमरण आले आहे. 6 सप्टेंबर रोजी काश्मीरच्या लेह भागात कर्तव्य बजावत असताना हिमस्खलन होऊन त्यांचा उंच डोंगरावरून 1 हजार फुटाहुन अधिक खोल दरीत पडून अपघात झाला. या अपघातामध्ये डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांच्यावर लष्करी इस्पितळात औषधोपचार सुरू होते. मात्र, रविवारी (ता. […]
अधिक वाचा...ठाणे येथे इमारतीची लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना; मृतांचा आकडा वाढला…
ठाणे: ठाण्यातील बाळकुम येथे एका ४० मजली नवीन इमारतीची लिफ्ट कोसळून रविवारी (ता. १०) मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये सात मजुरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. इमारतीची लिफ्ट कोसळून प्रथम झालेल्या अपघातात सहा कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आणखी एका कामगाराचा दुर्दैवी […]
अधिक वाचा...किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणी वृत्तवाहिनीच्या संपादकावर गुन्हा दाखल…
मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. लोकशाही न्यूजचे संपादक कमलेश सुतार आणि अनिल थत्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 500 (मानहानी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (ई) आणि 67 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कमलेश सुतार आणि अनिल […]
अधिक वाचा...गणेशोत्सवासाठी राज्य महामार्ग वाहतूक पोलिसांची बैठक…
मुंबई : गणेश उत्सव 2023 बाबत राज्य महामार्ग वाहतूक पोलिसांनी मंगळवारी (ता. 5 ) विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध निर्णय घेण्यात आले. गणेशोत्सवादरम्यान महामार्गावर काय करता येईल आणि कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत बैठकीत चर्चा झाली. विविध ठिकाणी सुविधा केंद्र तयार […]
अधिक वाचा...