भीषण अपघात! सातारच्या आठ मित्रांची हर्णे बीचची ट्रीप ठरली अखेरची; पाहा मृतांची नावे…

रायगड: रायगड जिल्ह्याच्या आंबेनळी घाटात रविवारी रात्रीच्या सुमारास पर्यटकांची एक स्कॉर्पिओ गाडी अनियंत्रित होऊन थेट ७०० ते ८०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात गाडीतील सर्व ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत पर्यटक सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सर्वजण वीकेंड साजरा करण्यासाठी शुक्रवारी दापोलीजवळील हर्णे बीचवर गेले होते. मात्र त्यांची ही कोकण ट्रीप अखेरची ठरली आहे.

पोलादपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद रोहिदास हावळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्याच्या आसगाव येथील आठ युवक शुक्रवारी रात्री रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली येथील हर्णे बीचवर फिरायला गेले होते. कोकणात वीकेंड घालवल्यानंतर रविवारी रात्री उशिरा सर्वजण साताऱ्याकडे येत होते. ते सर्वजण आपल्या स्कार्पिओ गाडीने पोलादपूर मार्गे आंबेनळी घाटातून साताऱ्याकडे येत होते. दरम्यान दाभीळ गावच्या हद्दीमध्ये त्यांचा गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि गाडी खोल दरीमध्ये कोसळली. या स्कॉर्पिओमध्ये आठ प्रवासी होते, यातील सर्वच जणांचा मृत्यू झाला आहे. रात्रभर चाललेल्या बचाव कार्यातून पाच मृतदेह बाहेर काढले आहेत. अद्याप तीन जणांचे मृतदेह सापडले नाही. मृतदेह शोधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 165 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 165 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस प्रशासन, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि रेस्क्यू टीमच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, दरीची खोली जवळपास ७०० ते ८०० फूट असल्याने आणि रात्रीचा अंधार असल्याने बचावकार्यात प्रचंड अडचणी येत होत्या. मृतदेह दरीतून वर काढण्यासाठी रेस्क्यू टीमला शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. अपघाताचे कारण समजू शकलेले नाही. कोकण फिरायला गेलेल्या आठ मित्रांचा अशाप्रकारे घाटात मृत्यू झाल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघातातील मृतांची नावे पुढीलप्रमाणे…
महेश अनिल पवार (वय 25)
आदित्य अशोक साळुंखे (वय 21)
रितेश राजेंद्र लोखंडे (वय 25)
सुहास जितेंद्र लोखंडे (वय 20)
अंश समीर चव्हाण (वय 18)
उत्कर्ष आनंद शिंगटे (वय 21)
अनिल अभिमन्यू शिंगटे (वय 25)
नितीन किसन नायकोंडे (वय 35)

काळाचा घाला! पिंपरीतील मित्रांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात; कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू…

पुणे! नवीन थारने कोकणात जाताना अपघातात सहा मित्रांचा मृत्यू; पाहा नावे…

वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या तीन मित्रांचा अपघाती मृत्यू…

भीषण अपघात! दोन सख्ख्या भावांसह पाच मित्रांचा जागीच मृत्यू…

बार्शी-धाराशिव मार्गावर भीषण अपघात; तिघा मित्रांचा जागीच मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!