क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना दीड लाख रुपयांची लाच घेताना पकडले रंगेहात…
परभणी : परभणी जिल्ह्यात एसीबीकडून मोठी कारवाई करण्यात आली असून, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे एसीबीच्या जाळ्यात अडकल्या आहेत. स्विमिंग पूल बांधण्यास परवानगी देण्यासाठी कविता नावंदे यांनी अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यातील, दीड लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. परभणी जिल्ह्यातील क्रीडा विभागात लाचप्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. एका क्रीडा स्पर्धेचे बिल आणि स्विमिंग […]
अधिक वाचा...शासनाच्या परवानगी शिवाय भ्रष्टाचाराच्या खटल्याची दखल नाही…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : वडगांव रोड पोलीस स्टेशन अंतर्गत शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचेवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, १०, ११ व १३ अंतर्गत दाखल गुन्ह्याची दखल घेण्यासाठी शासनाची मंजूरी आवश्यक असते, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती उर्मीला जोशी – फाळके यांनी व्यक्त केला. वडगांव रोड पोलीस ठाण्यातंर्गत सहाय्यक गट विकास अधिकारी […]
अधिक वाचा...सेवानिवृत्त उप विभागीय पोलिस अधिकारी विरोधात गुन्हा दाखल…
घाटंजी (यवतमाळ) : यवतमाळ जिल्हा पोलिस विभागातून सेवानिवृत्त झालेले उप विभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार (SDPO) व त्यांच्या पत्नीच्या विरोधात बेहिशोबी मालमत्ता जमविल्या प्रकरणी मुंबई येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड येथील भाग्यनगर पोलिस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायदा 13 (1) (ब), 13 (2), 12 नुसार अपसंपदेचा गुन्हा दाखल केला आहे. सदरची कार्यवाही लाच लुचपत […]
अधिक वाचा...पोलिस दलात खळबळ! लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा दाखल…
कोल्हापूर : पोलिसांनी जप्त केलेला आयशर टेम्पो परत देण्यासाठी आयशर मालकाच्या मित्राकडून 50 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी गांधीनगर पोलिस ठाण्यामधील एपीआय, पीएसआय आणि कॉन्स्टेबलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कोल्हापूर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून दीपक शंकर जाधव (वय 44, सहा. पोलिस निरीक्षक, गांधीनगर पोलिस ठाणे, (सध्या रा. अर्थव ओंकार कॉप्लेक्स […]
अधिक वाचा...साताऱ्यात लाच घेणाऱ्या न्यायाधीश प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिस अधिकारी…
सातारा : साताऱ्यातील लाच घेणाऱ्या न्यायाधीश प्रकरणाला नवा ट्विस्ट प्राप्त झाला आहे. न्यायाधिशांना पाच लाखाच्या लाच प्रकरणात सहाय्य करणाऱ्या इतर तिघा आरोपींपैकी एक पोलिस अधिकारी असल्याचे समोर आले आहे. आरोपी किशोर खरात हे सहाय्यक पोलिस निरिक्षक असल्याचे तपासात उघड झाले आहे. किशोर खरात हे मुंबई पोलिस खात्यात कार्यरत असून वरळी येथे ते कार्यरत आहेत. न्यायाधीश […]
अधिक वाचा...निवडणूक आयोगाच्या भरारी पथकातील लाच घेणारे पाच अधिकारी निलंबीत…
ठाणे : निवडणूक काळात निवडणूक यंत्रणाच्या विश्वासाला तडा जाणारे कृत्य समोर आले आहे. फूल विक्रीचा व्यवसाय करणाऱ्याकडून लाच मागणाऱ्या निवडणूक आयोगाच्या 5 अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये ही घटना घडली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फूल विक्रेते असलेले बबन आमले हे अहमदनगरला शेतकऱ्यांना त्यांची रक्कम देण्यासाठी जात होते. त्याच दरम्यान निवडणूक […]
अधिक वाचा...लाच घेतल्या प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा व 12 हजार द्रव दंड…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : वणी एरिया निलजई माईन्स येथील डब्स.सी.एल फायनान्स व्यवस्थापक माणीकलाल मदनमोहन पोल, लिपीक अविनाश मारोतराव काकडे यांनी ₹ 2000 लाच घेतल्या प्रकरणी केळापूर न्यायालयाचे न्यायाधिश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांनी 5 वर्षांची शिक्षा व ₹ 12,000 द्रव दंड ठोठावला आहे. सरकारी पक्षातर्फे सीबीआय – एसीबीचे विशेष […]
अधिक वाचा...युवती झाडू काम करून उपजिल्हाधिकारी झाली अन् आता अटक…
जयपूर (राजस्थान): एका युवतीने जोधपूर महापालिकेत रस्त्यावर झाडू मारण्याचे काम करत असतानाच अभ्यास करून उपजिल्हाधिकारी झाली. नागरिकांनी अभिनंदननाचा वर्षाव केला होता. पण, उपजिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना लाच घेताना पकडल्यानंतर अटक करण्यात आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. रस्त्यावर झाडू मारणारी आशा कंडरा 2021 मध्ये उपजिल्हाधिकारी बनून चर्चेत आल्या होत्या. राजस्थान प्रशासकीय सेवा परीक्षा (RAS) […]
अधिक वाचा...लाचेची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा जामीन मंजूर…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : लाचेची मागणी केल्या प्रकरणी आर्णी पंचायत समितीचे ग्रामसेवक महेश मंचलवार (48 वारको सिटी यवतमाळ) यांच्या तक्रारीवरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषदेचे पंचायत विस्तार अधिकारी तथा प्रभारी सहाय्यक गट विकास अधिकारी रामदास चंदनकर, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जालींदर आभाळे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 7 अंतर्गत […]
अधिक वाचा...शेतकऱ्याकडून लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याच्या घरात मिळालं घबाड…
बीड: बीडच्या माजलगाव पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता असलेले राजेश सलगर यांच्यावर लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई सुरू असून, घरामध्ये 11 लाख रुपये रोख स्वरूपात आढळून आले आहेत. शिवाय, 30 ग्रॅम सोने, 3 किलो 400 ग्रॅम चांदी असा लाखोंचा मुद्देमाल कारवाईत जप्त करण्यात आला आहे. गाळ उपसा परवानगी देण्यासाठी एका शेतकऱ्याकडून 28 हजार रुपयांची लाच […]
अधिक वाचा...