
राजधानीत युवकाला १७वेळा चाकूने भोकसलं; घटना CCTV मध्ये कैद…
नवी दिल्ली : राजधानीत रस्त्यातच युवकावर चाकूने हल्ला करण्यात आला असून, तब्बल १७वेळा चाकूने भोकसले. युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
CCTV कॅमेऱ्यात कैद झालेल्या घटनेच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, रस्त्याच्या कडेला दोन युवक बोलत होते. एक युवक बसलेला तर दुसरा उभा आहे. अचानक तिथे तिसरा एक व्यक्ती येतो. तिसरा व्यक्ती तिथे येताच आधीच तिथे उभा असलेल्याने सुमित नावाच्या युवकावर चाकूने सपासप वार करण्यास सुरवात केली. सुमित गंभीर जखमी झाला आणि जागीच कोसळला. हल्ला होत असताना तिसरा युवकही तिथेच होता. युवकाच्या मृत्यूनंतर दोघांनीही घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान, संबंधित घटना घडल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर एका आरोपीला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसकाका Video News: २४ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
माजी सैनिकाने आईसह भाऊ, वहिनी आणि 3 चिमुकल्यांची क्रूरपणे केली हत्या…
अनैतिक संबंध! प्रियकराने केली प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या…
‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमची आत्महत्या…
डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीची आत्महत्या…

