Video : गणपतीच्या मंडपात नाचताना युवकाचा मृत्यू झाला कॅमेरात कैद…

धर्मावरम (आंध्र प्रदेश): गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या मंडपात नाचताना युवकाचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली

प्रसाद (वय 26) असे मृत तरुणाचे नाव आहे. संबंधित घटना 20 सप्टेंबर रोजी घडली. आंध्र प्रदेशातील धर्मावरम नगरात गणेश चतुर्थीनिमित्त मंडप सजवण्यात आला होता. तिथे प्रसाद त्याच्या एका मित्रासोबत गाण्यावर नाचत होता. त्यानंतर प्रसाद अचानक खाली पडला. प्रसादला नागरिकांनी तत्कळ रुग्णालयात नेले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने प्रसादचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, एप्रिल महिन्यातही अशाच प्रकारची घटना घडली होती. डीजेच्या तालावर नाचताना एक व्यक्ती अचानक खाली कोसळली होती. त्या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. फेब्रुवारीमध्ये तेलंगणातूनही अशीच बातमी समोर आली होती. नातेवाईकाच्या लग्नाला गेलेल्या तरुणाचा डीजेवर नाचताना मृत्यू झाला होता. नाचताना तो तोंडावर पडला आणि पुन्हा उठला नाही.

Video: लालबागच्या राजाच्या मंडपात फ्री स्टाईल हाणामारी…

Video: पाकिस्तानमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर!

Video: गणपती वर्गणीच्या नावाखाली किरणा दुकानदाराच्या लावली कानाखाली…

Video: अल्पवयीन मुलाने गुपचुप वडिलांची कार केली सुरू अन्…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!