
पुणे! वाघोली पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रसाठी बाळगणाऱ्यास केली अटक…
पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील वाघोली पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना अंमली पदार्थ विक्रसाठी बाळगणाऱ्यास ताब्यात घेतले असून, अंमली पदार्थ जप्त करत आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पुणे शहरामध्ये अंमली पदार्थाचे अवैध विक्रीवर आळा घालणे करीता अंमली पदार्थांचे समुळ उच्चाटण करणेबाबत आदेशीत केले आहे. पोलिस उप आयुक्त, परीमंडळ ०७, सहा. पोलिस आयुक्त, लोणीकंद विभाग व वरीष्ठ पोलिस निरीक्षक वाघोली पोलिस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली ३०/०५/२०२६ रोजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचे सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी व तपास पथक अंमलदार असे गुन्हे प्रतिबंध, अवैध धंदयावर कारवाई करणेकामी पेट्रोलींग करीत होते. केसनंद रोड, जोगेश्वरी विदयालय येथील, बस स्टॉप जवळ पेट्रोलींग करीत असताना सहा फौजदार बाबासाहेब मोराळे, पोशि अशोक शेळके, पोशि सुनिल कुसाळकर यांना एक संशयित दिसला. संशयिसात हटकले असता तो पळुन जाण्याचे तयारीत असल्याने त्यांचेवर अधिक संशय आल्याने त्यास ताब्यात घेतले. शिव कालू सिंह (वय ३३ वर्षे, धंदा गॅस रिपेरिंग, रा. गल्ली नंबर ६, बालाजीनगर, केसनंद रोड, वाघोली, पुणे. मुळगाव मु.पो. कानसिंग की सिड, ता. पलोदी, जि. जोधपूर, राज्य राजस्थान) याची अंगझडती घेतली असता ११,३८,९०० /- रू किं ची ३२ ग्रॅम ५४० मिली वजनाची ब्राऊन शुगर (हेरॉईन) हा अंमली पदार्थ मिळून आले. अंमली पदार्थ जप्त करून गु.र.नं. ३६४ / २०२६ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ ( ब ) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याची पोलिस कस्टडी घेवून त्याचे राहते घराची झडती घेतली असता १,८०४/- रू किं चा १२० ग्रॅम २८० मिली वजनाचा पॉपी स्ट्रॅ (डोडाचुरा ) हा अंमली पदार्थ मिळून आल्याने जप्त करून एन. डी. पी. एस. अॅक्ट नुसार कलम १५(अ) वाढ करण्यात आली आहे. एकुण ११,४०, ७०४/- रु किं चा ब्राऊन शुगर (हेरॉईन) व पॉपी स्ट्रें (डोडाचुरा) असे दोन अंमली पदार्थ मिळून आल्याने ते जप्त केले आहेत. अधिक तपास तपास पथक अधिकारी मनोज बागल करीत आहेत.
View this post on Instagram
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त अमितेशकुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर, मनोज पाटील, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, प्रशांत अमृतकर, पोलिस उप आयुक्त विषेश शाखा, अति. कार्य, परीमंडळ ७, पुणे शहर, नुतन पवार सहा. पोलिस आयुक्त, लोणीकंद विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली नंदकुमार गायकवाड, वरीष्ठ पोलिस निरीक्षक वाघोली पोलिस स्टेशन, पल्लवी मेहेर, पोलिस निरीक्षक (गुन्हे), वाघोली पोलिस स्टेशन, तपास पथक अधिकारी पोउपनि / मनोज बागल, पोलिस अंमलदार बाबासाहेब मोराळे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनाथ बोयणे यांनी केली आहे.
स्वारगेट पोलिसांनी प्रवाशांचे सोन्याचे दागीने चोरणाऱ्या सराईत चोरट्यास केले जेरबंद…
पुणे पोलिसांनी 70 कॅमेरे तपासले अन् चिमुकलीची केली सुटका; पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव…
विषारी दारू! पुणे ग्रामीण पोलिस दलातील चार जणांचे तत्काळ निलंबन…
पुणे शहरात लक्ष्मीनगर पोलिसांकडून दारूभट्ट्या चालवणाऱ्या महिलांसाठी प्रशिक्षण मेळावा…
पुणे! विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई, 9 पोलिस अधिकारी निलंबित, पाहा नावे…

