पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीचा पाण्यात बुडून मृत्यू…

जालना : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीचा खदानीत बुडून मृ्त्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अंबड तालुक्यात घडली आहे. प्रीती काशीराम भाकड (वय १९, रा. अंबड) असे मृत युवतीचे नाव आहे. या प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत खदानीचे संचालक आणि प्रशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रीती भाकड ही गेल्या काही काळापासून आगामी पोलिस भरतीची कसून तयारी करत होती. दररोज पहाटे उठून धावणे, पोहणे आणि इतर शारीरिक कसरतींचा सराव करणे हा तिचा नित्यक्रम होता. 4 जून रोजी नेहमीप्रमाणे ती सरावासाठी शहरापासून काही अंतरावर असलेल्या वळवंडा शिवारातील एका पाण्याने भरलेल्या खदानीच्या परिसरात गेली होती. सराव करत असताना अचानक तिचा अंदाज चुकल्याने ती खदानीच्या खोल पाण्यात बुडू लागली. प्रीतीला पाण्यात बुडताना पाहून तिथे उपस्थित असलेल्या इतर मुलांनी तात्काळ आरडाओरड केली. काही जणांनी तिला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र पाण्याच्या खोलीमुळे आणि गाळामुळे त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले आणि प्रीतीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याच्या पथकाने तातडीने वळवंडा शिवारातील घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने अथक प्रयत्नांनंतर प्रीतीचा मृतदेह खदानीबाहेर काढण्यात आला. प्रीतीच्या मृत्यूची बातमी समजताच तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण अंबड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, प्रीतीच्या कुटुंबियांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. योग्य सुरक्षा व्यवस्था नसताना आणि निष्काळजीपणा केल्यामुळेच प्रीतीचा जीव गेल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. वडील काशीराम भाकड यांच्या तक्रारीवरून अंबड पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. खदानीचे संचालक आणि संबंधित प्रशिक्षकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही संशयितांना तात्काळ ताब्यात घेतले आहे. अंबड पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

भीषण अपघात! पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तीन युवकांना एसटी बसने चिरडले…

पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीची आत्महत्या…

धक्कादायक! पोलिस भरतीच्या तयारीसाठी अकॅडमीत गेलेल्या युवतीची आत्महत्या…

स्वप्न राहिले अपूर्ण! PSI परीक्षेत राज्यात अव्वल आलेल्या अश्विनी केदारी हिचा दुर्देवी मृत्यू…

पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!