
पुणे! सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला येऊ; विवाहितेची आत्महत्या…
पुणे : सासरच्या मंडळींनी केलेल्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तेजस्विनी गोरख सोनवणे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या घटनेमुळे चंदननगर परिसरात प्रचंड संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
चंदननगर पोलिस ठाण्यात मृत विवाहितेच्या पतीसह सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तेजस्विनीचे वडील शामराव बाळासाहेब गवळी (वय ५२ वर्षे, व्यवसाय-शेती, रा. मासावाडी रोड, नवीन वांगदरी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती गोरख संभाजी सोनवणे (वय ३२), सासरा संभाजी लक्ष्मण सोनवणे (वय ६२ वर्षे) , सासू अलका संभाजी सोनवणे (वय ५५ वर्षे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
View this post on Instagram
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्विनीचा विवाह 25 जून 2020 रोजी गोरख सोनवणे याच्याशी झाला होता. दांपत्याला अडीच वर्षांची मुलगी आहे. एप्रिल 2026 मध्ये पती गोरख याला फ्लॅट खरेदी करायचा होता. त्यासाठी त्याने तेजस्विनीकडे 3 लाख रुपयांची मागणी सोबत मारहाण केली. माहेरच्या लोकांशी संपर्क तोडण्यास भाग पाडले गेले. महिन्याभरातच अधिक मास’ (धोंड्याचा महिना) असल्याने तेजस्विनीच्या वडिलांनी जावई आणि व्याहींना परंपरेनुसार जेवणासाठी बोलावले होते. मात्र, आम्हाला सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला येऊ, नाहीतर येणार नाही, असा हट्ट पतीने धरला. अखेर ते जेवायला आले, पण तिथेही त्यांनी वाद घालत रागाच्या भरात तेजस्विनीला सर्वांसमोर मारहाण करून शिवीगाळ केली. सासरच्या लोकांची पैशांची आणि वस्तूंची हाव संपत नसल्याने तेजस्विनी मानसिक दडपणाखाली होती.
2 जून 2026 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पती गोरख याने तेजस्विनीच्या वडिलांना फोन करून सांगितले की, तेजस्विनीने आतून दरवाजा लावून घेतला असून ती दार उघडत नाही, या फोननंतर काही वेळातच तेजस्विनीचे मामा दत्तात्रय बापूराव दाते यांनी तेजस्विनीने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे सांगितले. यामुळे माहेरच्यांना मोठा मानसिक धक्का बसला असून, त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी वडीलांचा धक्कादायक खुलासा…
पुणे! युवकाच्या ब्लॅकमेलिंगमुळे युवतीने केली आत्महत्या…
पुणे! प्रेमप्रकरणातून महिलेची आत्महत्या; कागदाचे तुकडे जोडत पोलिसांनी उकललं गूढ…
पुणे! IT इंजिनिअरची सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या; प्रेमप्रकरण की तणाव…
पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

