पुणे शहरातील काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी…

पुणे (संतोष धायबर): काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, रेकॉर्डवरील तडीपार आरोपीकडून ०२ गावठी पिस्टल, चार मॅगझीन व चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. काळेपडळ पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहर कार्यक्षेत्रातील पोलिस ठाणे हद्दीत अवैध धंदे, अभिलेखांवरील आरोपीत इसम तडिपार इसम अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार यांना चेक करण्याबाबत आदेशित केले होते. त्याअनुशंगाने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे काळेपडळ पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना, पोलिस अंमलदार विशाल ठोंबरे, गिरीराज जगदाळे, अतुल पंधरकर व महादेव शिंदे यांना त्यांचे गोपनिय बातमिदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी आकाश संतोष भारती, गणेश बबन लोंढे व त्यांचे दोन साथिदार हे हेवन पार्क ते लक्ष्मिपार्ककडे जाणा-या मधल्या कच्च्या रस्त्यावर अंधारात कोणतातरी दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशाने आपले कब्जात काहीतरी संशयित चिजवस्तु जवळ बाळगून थांबलेले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

सदरबाबत तपास पथक अधिकारी सपोनि अमित शेटे, पोलिस उप-निरीक्षक विनायक गुरव यांना कळविले असता, त्यांनी सदरची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांना कळविली. त्यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अमित शेटे, पोउनि विनायक गुरव व पोलिस स्टाफ असे हेवनपार्क ते लक्ष्मिपार्ककडे जाणा-या रोडलगत असणारे मोकळ्या जागेच्या आडबाजुस सर्व टिमला दिलेल्या सुचनांप्रमाणे जावुन मिळालेल्या माहितीची खात्री केली असता, रेकॉर्डवरील आरोपी आकाश भारती व त्याचा साथिदार दिपक बिष्ट यांना शिताफीने ताब्यात घेतले. अंधाराचा फायदा घेवुन गणेश लोंढे तेथुन पळुन गेला.

आकाश भारती व दिपक बिष्ट यांचे अंगझडतीत एक गावठी बनावटीचे पिस्टल, एक अधिकचे मॅगझिन व दोन जिवंत राऊंड दिनांक ०२/०६/२०२६ रोजी जप्ती करण्यात आले होते. पळून गेलेला आरोपी गणेश लोंढे यास गुप्त बातमिदारातुन मिळालेल्या माहितीनुसार दगाई माता फॉरेस्ट, तरवडे वस्तीमागे, पुणे येथून सापळा रचुन दि. ०४/०६/२०२६ रोजी ताब्यात घेतले. त्याचेकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल, एक अधिकचे मॅगझिन च दोन जिवंत राऊंड जप्त करण्यात आलेले आहेत. कारवाईमध्ये वरील नमुद आरोपींकडुन दोन गावठी बनावटीचे पिस्टल, दोन अधिकचे मॅगझिन व चार जिवंत राऊंड असा एकुण १,४४,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल मिळुन आलेला आहे. आरोपींमध्ये १) आकाश सतोष भारती वय २७ वर्षे, २) दिपक राम बिस्ट वय २० वर्षे व वानवडी पोलिस ठाणेकडील तडीपार आरोपीत ०३ ) गणेश बबन लोंढे, वय २५ वर्षे यांचेवर काळेपडळ पोलिस ठाणे, पुणे गुन्हा रजि.नं. २५०/२०२६, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५, १४२ बी.एन.एस. कलम ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करुन, आरोपीत यांना दाखल गुन्ह्यात अटक करुन, गुन्ह्याचा तपास सहा. पोलिस निरीक्षक अमित शेटे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही जीवन बेनीवाल, पोलिस उप आयुक्त परिमंडळ ६, पुणे शहर, अतुल नवगिरे, सहाय्यक पोलिस आयुक्त, हडपसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली गिरीषा निंबाळकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, काळेपडळ पोलिस स्टेशन यांचे सुचनेप्रमाणे सहा. पो. निरी. अमित शेटे, पोउनि विनायक गुरव, पोलिस हवालदार प्रविण काळभोर, अमोल फडतरे, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, शाहीद शेख, पोलिस अंमलदार विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदिप बेडीस्कर, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे यांचे पथकाने केली आहे.

निलेश घायवळ याच्या भावाला राजस्थानमधून अटक, मंदिरातील प्रसादावर…

पुणे! वाघोली पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रसाठी बाळगणाऱ्यास केली अटक…

पुणे! सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला येऊ; विवाहितेची आत्महत्या…

पुणे पोलिसांनी 70 कॅमेरे तपासले अन् चिमुकलीची केली सुटका; पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव…

पुणे! विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई, 9 पोलिस अधिकारी निलंबित, पाहा नावे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!