पुणे! सियाच्या फोनमधून ‘मानसी गोविंदपूरकर’चं कनेक्शन समोर! Chat GPT ला विचारलं…

पुणे: केतन अग्रवाल प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटनंतर प्रकरणातील अनेक गोष्टींचा खुलासा आहे. पुण्यात यापूर्वी घडलेल्या हत्याकांडांचा आणि लोणावळा परिसरातील दरीत पडून झालेल्या मृत्यूंचाही सखोल अभ्यास केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सिया गोयल हिच्या फोन मधून अनेक गोष्टी पोलिसांच्या हाती लागल्या असून आता मानसी गोविंदपूरकर मृत्यू प्रकरणातं कनेक्शन देखील सिया गोयल प्रकरणात समोर आले आहे.

सिया गोयलने केतनला मारण्यासाठी लोणावळा आणि आसपासच्या परिसराचा आढावा घेतला होता. त्यावेळी तिने टायगर पाईंट आणि लोहगडाची माहिती शोधली. लोणावळा परिसरात यापूर्वी याचपद्धतीने घडलेल्या दरीत पडून मृत्यूच्या घटनांचाही शोध घेण्यात आला. त्यावेळी सिया गोयल हिला मानसी गोविंदपूरकर नावाच्या तरुणीची माहित मिळाली. टायगर पॉइंट तसेच लोहगड परिसरात मानसी गोविंदपूरकर तरुणीचा पडून मृत्यू झाल्याच्या घटनांची माहिती आरोपींनी शोधली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

सांगवीमधील रहिवासी मानसी गोविंदपूरकर (वय २१) हिचा 20 मार्च 2025 रोजी मृतदेह लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या नवग्रह मंदिराजवळील झुडुपात सापडला होता. याचाच शोध सियाने घेतला अन् केतनला लोहगडावरच संपवायचं ठरवले. सिया, चेतन चौधरी आणि रितेश हंगे यांच्यात ही माहिती सोशल मीडिया आणि मेसेजिंग माध्यमातून शेअर झाल्याचे देखील पोलिसांचे म्हणणे आहे. त्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हत्येचा कट रचण्याच्या दिवशी आरोपींनी सुरुवातीला सोनम रघुवंशी हिने घडवलेल्या राजा रघुवंशी हत्याकांडाचा अभ्यास केला. त्यातील चुकांची माहिती त्यांनी शोधल्याचे तपासात आढळले आहे. त्यानंतर लोणावळा आणि टायगट पॉईंट परिसरात अशा प्रकारचे लोकेशन देखील शोधण्यात आले होते. अशातच आता कोर्टात या केसमध्ये काय काय समोर येणार? असा प्रश्न पडला आहे. तसेच सिया गोयलचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. शिवाय, केतनच्या हत्येनंतर Chat GPT ला ‘दु:ख कसं व्यक्त करायचं?’ हे सुद्धा विचारले होते, अशी माहिती समोर आली आहे.

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणी सिया गोयलचा होणार ‘गेम ओव्हर’…

सिया गोयल आणि चेतन चौधरी याच्याबाबत हादरवणारी माहिती समोर…

सिया गोयल हिचं व्हॉट्सॲप चॅटमधून उघड झाली धक्कादायक माहिती…

सियाच्या घरातून जुना मोबाईल पोलिसांना मिळाला; धक्कादायक माहिती समोर…

केतन अग्रवाल याच्या आजोबांनी आठवणीने व्याकूळ होत सोडला जीव…

पुणे! सियाची लाय डिटेक्टर टेस्ट नाकारली; जामिनाचा मार्ग मोकळा…

सीन रिक्रिएशन! लोहगडावर दाट धुकं अन् पाऊस, पोलिस भल्या पहाटे चेतनला घेऊन गेले…

सियाचा चक्रावून टाकणारा खुलासा! केतनसोबत महाबळेश्वरला रुममध्ये राहायचं नव्हतं…

सिया हिचा धक्कादायक खुलासा; केतनला दरीत ढकलल्यानंतर चेतन पळून गेला अन्…

केतनच्या वडिलांनी सियाबद्दल केला मोठा खुलासा; तिला अनेक वाईट व्यसनं…

केतनचे टक्कल अन् एक गोष्ट खटकायची, पोलिस तपासात सिया लागली घडाघडा बोलू…

खळबळजनक खुलासा! सिया बारावी नापास, दारूचं व्यसन, अनेक बॉयफ्रेंड अन्…

पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल रात्रीच्या अंधारात पोहचले लोहगडावर अन्…

सियाची आई म्हणाली; केतनने मुलापेक्षाही जास्त प्रेम दिलं; दोघांनाही ढकलून द्या…

सिया गोयल हिच्या वडिलांचा मोठा खुलासा; सगळं खोटं…

केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट; सिया-चेतनच्या दाव्यांमुळे पोलिसही चक्रावले…

केतन जिवंत असल्याचे पोलिसांनी सांगताच सियाला फुटला घाम…

केतनला संपवण्यासाठी सिया-चेतन महाभयंकर प्लॅन बी होता तयार; पोलिसही चक्रावले…

केतनशी लग्न ठरल्यानंतरही सियाचे अनेक मुलांशी चॅटिंग, CDR मधून हादरवणारी माहिती…

पुणे! केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती; सिया-चेतनचं कसं जुळलं सूत पाहा…

केतनला ढकलून दिल्यानंतर सियाने लिहिली भलीमोठी पोस्ट; म्हणाली तू मला…

पुणे! लग्नासाठी 2 विमानं बूक अन् केतन अग्रवालची खूनी निघाली होणारी बायको…

पुणे! लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, दोन विशेष विमाने; लग्नाआधीच युवकाचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!