पुणे! विद्यानंद बापट यांचा इम्पॅक्ट, 14 डीजे चालकांवर गुन्हे दाखल…

पुणे : गणेशोत्सवात विद्यानंद बापट यांचा इम्पॅक्ट पाहायला मिळत असून डीजे बंदीच्या मुद्द्यावरुन लोक आक्रमक झाल्यानंतर आता पोलिसांकडूनही कारवाई केली आहे. सोलापूर, नागपूर, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात ध्वनीप्रदुषणाला टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत डीजे वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पुण्यातही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी लेझर लाईट आणि डीजेचा वापर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये 14 डीजे चालक, मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत 14 सप्टेंबर 2026 पासून सुरु झालेल्या गणेशोत्सवादरम्यान डीजेचा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 20 मंडळांवर आणि डीजे चालक मालकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. गणेशोत्सवापूर्वी पोलिस आयुक्त तसेच परिमंडळ उप आयुक्तांनी बैठका घेऊन डीजेमुळे लहान मुले, वयोवृद्ध आणि आजारी व्यक्तींना त्रास होत असल्याने ध्वनीप्रदूषण न करण्याच्या स्पष्ट सूचना आणि समज दिली होती. तरीसुद्धा 21 सप्टेंबर 2026 रोजी, म्हणजेच गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करून ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत एकूण 20 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवाय, मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये सांगवी पोलिस स्टेशनमध्ये सर्वाधिक 9, तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनमध्ये 5, भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये 2, शिरगाव पोलिस स्टेशनमध्ये 2, तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये 1 आणि बावधन पोलिस स्टेशनमध्ये 1 गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे परिस्थितीत फारसा काही फरक पडेल, असं मला अजिबात वाटत नाही. यापूर्वीही मुंबई उच्च न्यायालयाने अनेकदा निर्देश दिले आहेत. मात्र, या निर्देशांची प्रत्यक्षात अंमलबजावणी कुठे होते, हा खरा प्रश्न आहे. लाऊडस्पीकर आणि ढोल-ताशे पूर्णपणे बंद झाले पाहिजेत. केवळ नियम आणि निर्देश देऊन उपयोग नाही, तर त्यांची कठोर अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, असे विद्यानंद बापट यांनी म्हटले आहे. उत्सव साजरा करणारे बदलतील आणि नियमांचं पालन करतील, असं मला वाटत नाही. न्यायालयाने दिलेले निर्देश यापूर्वीही अस्तित्वात होते. मात्र, गणपतीच्या आगमनापासूनच ढोल-ताशांचा मोठा आवाज आणि लाऊडस्पीकरचा कर्कश आवाज ऐकू येत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थितीत अद्याप कोणताही ठोस बदल झालेला दिसत नाही, अशी खंतही बापट यांनी व्यक्त केली होती.

सण उत्सवासह मिरवणुकीत सार्वजनिक स्थळी फटाके वाजवण्यास बंदी; अन्यथा…

पुणे शहरात विद्यानंद बापट यांना मारहाण! म्हणाले, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्…

पुणे! विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा नेमका कोण? महत्त्वाची माहिती समोर…

संतोष पंडित जेलमधून सुटल्यावर म्हणाले; मनापासून माफी मागतो…

गणेश मंडळांकडून प्रसाद अन् अन्नदानासाठी एफडीए नोंदणी बंधनकारक; पाहा नवी नियमावली…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!